नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : येथील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ७३.९६ टक्के निकालाची नोंद केली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल कामगिरीमुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या परीक्षेत कु. नम्रता रविंद्र खडके हिने ९२.२० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. कु. बरखा ब्रिजेशकुमार विश्वकर्मा हिने ९१.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. भाविका प्रेषित महाजन हिने ९१.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांकावर स्थान मिळविले.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये कु. बरखा ब्रिजेशकुमार विश्वकर्मा हिने ९१.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. तसेच देवांशू गजानन रूम याने ८३.४० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे लोक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सिंधूताई कोल्हे, संचालक ललित कोल्हे, संचालक पियुष कोल्हे, चिटणीस अवधूत गंगाराम पाटील, उपचिटणीस मनोज वासुदेव खडके, मुख्याध्यापक एस. डी. खडके, उपमुख्याध्यापक व्ही. आर. कोल्हे, पर्यवेक्षक. बी. एस. राणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







