• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जनसेवेत वावरणारे नेतृत्व प्रतापराव पाटील, विधान परिषदेत देखील मिळणार संधी ?

वाढदिवसानिमित्त राजकीय कारकिर्दीविषयी शुभाशीर्वाद

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 28, 2026
in Uncategorized, जळगाव, राजकारण
जनसेवेत वावरणारे नेतृत्व प्रतापराव पाटील, विधान परिषदेत देखील मिळणार संधी ?
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांचा आज वाढदिवस. मात्र, यंदाचा हा वाढदिवस केवळ शुभेच्छांचा वर्षाव ठरणार नसून, त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी प्रताप पाटील यांचे नाव आघाडीवर असून, त्यांना उमेदवारीचे ‘बर्थडे गिफ्ट’ मिळणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

प्रताप पाटील यांनी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. केवळ ‘मंत्र्यांचा मुलगा’ ही ओळख मर्यादित न ठेवता, त्यांनी ग्रामीण भागात स्वतःचे स्वतंत्र वलय निर्माण केले आहे. मतदारसंघातील लहानांपासून थोरांपर्यंत त्यांचा थेट संवाद असतो. कार्यकर्त्याच्या घरातील आनंद असो वा दुःख, प्रताप पाटील तिथे हजर असतातच. हीच ‘आपुलकी’ त्यांच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण ठरली आहे.

आरोग्य सेवा आणि तरुणाईची साथ..

संकटकाळात किंवा वैद्यकीय मदतीची गरज असताना प्रताप पाटील धावून जातात. आरोग्य सेवेतील त्यांच्या विशेष योगदानामुळे अनेक गरजू कुटुंबांना आधार मिळाला आहे. तसेच आक्रमक कार्यशैली आणि संयमी स्वभाव यामुळे तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. जिल्ह्यातील युवा वर्गाचे संघटन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

जागेचा पेच आणि ‘फिक्स’ उमेदवारीची चर्चा..

सध्या विधान परिषदेच्या जागेसाठी महायुतीमध्ये खलबतं सुरू आहेत. या जागेवर भारतीय जनता पक्षाने दावा केला असला तरी, पक्षश्रेष्ठींच्या चर्चेअंती ही जागा शिवसेना (शिंदे गट) कडे गेल्यास प्रताप पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि तळागाळातील पकड पाहता, ते निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार म्हणून ओळखले जातात.

“प्रतापराव केवळ तरुण तडफदार नेते नाहीत, तर ते कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: गुलाबराव पाटीलजळगाव राजकारणप्रताप गुलाबराव पाटीलमहायुतीविधान परिषद निवडणूकशिवसेना शिंदे गट
Previous Post

बाजार समिती सभापती विरोधात अविश्वास

Next Post

अटलांटा; महापालिकेची याचिका कोर्टाने फेटाळली

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अटलांटा; महापालिकेची याचिका कोर्टाने फेटाळली

अटलांटा; महापालिकेची याचिका कोर्टाने फेटाळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif