• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मेहरून तलाव बगीचाचे दिवस पालटणार…

लवकरच छ.शिवाजी उद्यानाचे सौंदर्यीकरण करणार : महापौर दीपमाला काळे यांचेसह सभापती, अधिकाऱ्यांनी केली पाहणी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 17, 2026
in जळगाव, विशेष बातमी
मेहरून तलाव बगीचाचे दिवस पालटणार…
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलाव आणि छत्रपती शिवाजी उद्यान परिसराच्या विकासासाठी जळगाव महानगरपालिका प्रशासन आता सरसावले आहे. सोमवारी १६ मार्च रोजी महापौर दीपमाला काळे यांनी या परिसराची सविस्तर पाहणी केली. यावेळी तलाव सुशोभीकरण, स्वच्छता आणि नवीन सुविधांबाबत त्यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

उद्यानाची स्वच्छता आणि सुविधांवर भर
छत्रपती शिवाजी उद्यानाच्या पाहणीदरम्यान महापौरांनी उद्यानातील काडीकचरा, वाळलेल्या फांद्या आणि अस्वच्छता तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना या उद्यानात चांगल्या सुविधा मिळतील या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

राज्यातील सर्वोत्कृष्ट ‘टिशू कल्चर लॅब’
यानंतर महापौरांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयाला भेट दिली. या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅकची त्यांनी माहिती घेतली. विशेष म्हणजे, महापालिकेच्या मालकीच्या जागेवर राज्यातील सर्वोत्कृष्ट अशी ‘टिशू कल्चर लॅब’ उभारली जात आहे. या लॅबमधील वृक्ष इतर संस्थांना वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ही लॅब उभारताना महापालिकेशी झालेला करार आणि तांत्रिक बाबींची माहिती यावेळी वनविभागाचे अधिकारी समाधान सोनवणे यांनी महापौरांना दिली.

मेहरूण तलावावर ‘गणेश घाटा’च्या धर्तीवर विकास

तलाव परिसरात ट्रॅक जवळ सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. तलावाच्या एका बाजूला गणेश घाटाप्रमाणे आकर्षक पायऱ्यांची रचना करण्यात येत आहे. तलाव परिसरात रेलिंग बसवून तो भाग बंदिस्त करण्यात येईल. पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच दोन बोटी सुरू करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तलावातील जलपर्णी महापालिकेने काढली असून, परिसरातील झाडाझुडपांची सफाई केली जाणार आहे. तलाव परिसरात पशुपालकांनी म्हशी आणू नयेत, यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक व प्रतिबंधात्मक फलक लावण्याचे आदेश देण्यात आले. पुलाखाली छोटा ब्रिज तयार करून समांतर मार्ग (ट्रॅक) विकसित केला जाणार आहे.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, गटनेते प्रकाश बालानी, नगरसेविका अॅड. शुचिता हाडा, नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, ऋतिक ढेकळे, रेखा पाटील, शहर अभियंता योगेश बोरोले, संदीप मोरे, विजय मराठे यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: कायापालट होणारजळगाव महापालिकाबगीचा सुशोभीकरणमहापौरमेहरून तलावमेहरून तलाव बगीचाशिवाजी उद्यानसभापती
Previous Post

दबावाला बळी न पडता नियमांनुसार काम करा –उपमहापौर मनोज चौधरी

Next Post

शासकीय वसतिगृहात आयटीआय विद्यार्थ्याची गळफास

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शासकीय वसतिगृहात आयटीआय विद्यार्थ्याची गळफास

शासकीय वसतिगृहात आयटीआय विद्यार्थ्याची गळफास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif