• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

दुर्गांचे जलसंस्कार’ छायाचित्र प्रदर्शनास जळगावात सुरुवात!

जळगावात ‘दुर्गांचे जलसंस्कार’ छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात; मान्यवरांच्या हस्ते दुर्गा वरील छायाचित्र पुस्तकाचे प्रकाशन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 6, 2026
in जळगाव, प्रदर्शन
दुर्गांचे जलसंस्कार’ छायाचित्र प्रदर्शनास जळगावात सुरुवात!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

दुर्गांचे जलसंस्कार’ छायाचित्र प्रदर्शनास जळगावात उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावात ‘दुर्गांचे जलसंस्कार’ छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात; मान्यवरांच्या हस्ते दुर्गा वरील छायाचित्र पुस्तकाचे प्रकाशन.

जळगाव प्रतिनिधी :  गोखलेज् अॅडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (गती) तर्फे आयोजित ‘दुर्गांचे जलसंस्कार’ या विषयावरील छायाचित्र प्रदर्शनास आजपासून जळगावात सुरुवात झाली. तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच मार्च महिन्यातील जागतिक जल दिनाचे औचित्य साधून हा एकदिवसीय उपक्रम आयोजित करण्यात आला. शहरातील पीएनजी ज्वेलर्स (जिल्हा बँकेसमोर) येथे आयोजित या प्रदर्शनात दुर्गांवरील जलव्यवस्थापनाचे अभ्यासपूर्ण छायाचित्रांद्वारे दर्शन घडविण्यात आले.

या प्रसंगी दुर्गांवरील जलसाठ्यांवर आधारित ‘दुर्गांवरील जलसंस्कार’ या फोटो अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य डॉ. सुहास गाजरे, प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रा. संजय दहाड, प्रा. चारुदत्त गोखले, प्रा. के. पी. अकोले, प्रा. देवदत्त गोखले आणि रश्मी गोखले यांच्या हस्ते या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी प्रा. देवदत्त गोखले यांनी किल्ल्यांवरील जलव्यवस्थापनाबाबत माहिती देताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गबांधणी करताना जलव्यवस्थापनाला अत्यंत महत्त्व दिले होते. अनेक किल्ल्यांवर नैसर्गिक तसेच खडक खोदून तयार केलेली टाके, तलाव आणि विहिरी आजही पाहायला मिळतात. या जलसाठ्यांवरून त्या दुर्गावरील शिबंदी, वस्ती, पर्जन्यमान तसेच दुर्गाचे सामरिक महत्त्व याचा अंदाज येतो. त्यामुळे हे केवळ पाण्याचे व्यवस्थापन नसून दुर्गांवर घडवलेले ‘जलसंस्कार’ असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रदर्शनात रश्मी गोखले यांनी विविध किल्ल्यांवरील जलसाठ्यांची अभ्यासपूर्ण छायाचित्रे सादर केली आहेत. ‘गती’ संस्थेमार्फत मागील आठ वर्षांपासून दुर्ग संस्कृती या विषयावर संशोधनात्मक कार्य सुरू असून त्याअंतर्गत कार्यशाळा, व्याख्याने, पुस्तक लेखन, दृकश्राव्य सादरीकरणे तसेच छायाचित्र प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते.

हे छायाचित्र प्रदर्शन आज दुपारी १२.०० ते रात्री ८.०० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. तसेच सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत “Clicks च्या कथा” या विषयावर माहितीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, छायाचित्रांमागील कथा, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व तसेच किल्ल्यांवरील जलसाठ्यांची रचना व व्यवस्थापन याविषयी माहिती दिली जाणार आहे.

दुर्ग संस्कृती अभियानांतर्गत आतापर्यंत ८ कॉर्पोरेट प्रशिक्षण कार्यक्रम आणि २ विशेष उपक्रम राबविण्यात आले असून, आजवर २३० हून अधिक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. जळगावकरांनी या छायाचित्र प्रदर्शनाचा तसेच व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दुर्ग संस्कृती कोअर टीमचे सदस्य देवदत्त गोखले, रश्मी गोखले, प्रवीण महाजन व श्रीरंग छापेकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: गडकिल्लेछत्रपती शिवाजी महाराजजलदुर्गजळगावप्रदर्शन
Previous Post

जळगावमध्ये “प्रॉपर्टी एक्स्पो” नाशिकमध्ये गुंतवणुकीची संधी!

Next Post

उद्यापासून नीट २०२६ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास होणार सुरुवात!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
उद्यापासून नीट २०२६ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास होणार सुरुवात!

उद्यापासून नीट २०२६ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास होणार सुरुवात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्याभरातील महिलांसाठी रविवारी अनोखा कार्यक्रम!

जिल्ह्याभरातील महिलांसाठी रविवारी अनोखा कार्यक्रम!

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 20, 2026
महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन

महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन

March 19, 2026
“कॅन्सर” ला रोखण्यासाठी ‘भूमी सुपोषण अभियान’ आवश्यक – डॉ. निलेश चांडक

“कॅन्सर” ला रोखण्यासाठी ‘भूमी सुपोषण अभियान’ आवश्यक – डॉ. निलेश चांडक

March 19, 2026
एक गुढी चिऊताईच्या संवर्धनासाठी! 

एक गुढी चिऊताईच्या संवर्धनासाठी! 

March 18, 2026
गॅस सिलिंडर टंचाईविरोधात शिवसेनेचे काळ्या पट्ट्या  बांधून निषेध आंदोलन!

गॅस सिलिंडर टंचाईविरोधात शिवसेनेचे काळ्या पट्ट्या  बांधून निषेध आंदोलन!

March 18, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif