• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home परीक्षा

उद्यापासून नीट २०२६ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास होणार सुरुवात!

८ मार्च रात्री ९ वाजेपर्यंत अर्जाची मुदत ; १० ते १२ मार्च दरम्यान दुरुस्तीची संधी. तर ३ मे रोजी परीक्षा 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 7, 2026
in परीक्षा, महाराष्ट्र, विशेष बातमी
उद्यापासून नीट २०२६ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास होणार सुरुवात!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – देशभरातील वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेल्या NEET 2026 (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ८ मार्च रात्री ९ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर काही त्रुटी आढळल्यास विद्यार्थ्यांना १० ते १२ मार्च या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, नीट २०२६ परीक्षा ३ मे रोजी देशभरातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळविण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक माहिती व इतर तपशील अचूक भरावेत, तसेच अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अर्ज भरणेआठ मार्चडॉक्टरतीन मे रोजी परीक्षानीट परीक्षाप्रक्रिया
Previous Post

दुर्गांचे जलसंस्कार’ छायाचित्र प्रदर्शनास जळगावात सुरुवात!

Next Post

क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे प्रॉपर्टी एक्स्पोचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शानदार उद्धाटन!.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे प्रॉपर्टी एक्स्पोचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शानदार उद्धाटन!.

क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे प्रॉपर्टी एक्स्पोचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शानदार उद्धाटन!.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्याभरातील महिलांसाठी रविवारी अनोखा कार्यक्रम!

जिल्ह्याभरातील महिलांसाठी रविवारी अनोखा कार्यक्रम!

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 20, 2026
महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन

महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन

March 19, 2026
“कॅन्सर” ला रोखण्यासाठी ‘भूमी सुपोषण अभियान’ आवश्यक – डॉ. निलेश चांडक

“कॅन्सर” ला रोखण्यासाठी ‘भूमी सुपोषण अभियान’ आवश्यक – डॉ. निलेश चांडक

March 19, 2026
एक गुढी चिऊताईच्या संवर्धनासाठी! 

एक गुढी चिऊताईच्या संवर्धनासाठी! 

March 18, 2026
गॅस सिलिंडर टंचाईविरोधात शिवसेनेचे काळ्या पट्ट्या  बांधून निषेध आंदोलन!

गॅस सिलिंडर टंचाईविरोधात शिवसेनेचे काळ्या पट्ट्या  बांधून निषेध आंदोलन!

March 18, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif