• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावमध्ये “प्रॉपर्टी एक्स्पो” नाशिकमध्ये गुंतवणुकीची संधी!

सागर पार्क मैदानावर प्रदर्शन; नाशिक क्रेडाईचे आयोजन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 5, 2026
in जळगाव, प्रॉपर्टी एक्सपो
जळगावमध्ये “प्रॉपर्टी एक्स्पो” नाशिकमध्ये गुंतवणुकीची संधी!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – नाशिक हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य प्रगतिशील शहर म्हणून ओळखले जाते. औद्योगिक ,शैक्षणिक ,आरोग्य तसेच कृषी यावर आधारित अनेक उद्योग संधी नाशिकमध्ये उपलब्ध आहेत .याच नाशिक मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीच्या अपरिमित संधी आहेत .या संधींची माहिती एकाच छताखाली मिळावी यासाठी बांधकामव्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे येत्या 7 ते 9 मार्च दरम्यान जळगाव मधील सागर पार्क ग्राउंड येथे ॑नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो या प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली.

 

ते पुढे म्हणाले हवेची गुणवत्ता आणि पाण्याची मुबलकता याचे वरदान लाभलेल्या नाशिक मधील हवामान अनेकांना आकर्षित करते. तसेच मुंबई पुण्यापासून कमी अंतर आणि जगभरातील सर्व प्रमुख शहरांसोबत वाढलेली कनेक्टिव्हिटी यामुळे नाशिक मधील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही भविष्यात लाभदायी ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. चेन्नई- सुरत महामार्ग, नाशिक जवळ विकसित होत असलेले वाढवण बंदर यासोबतच नुकत्याच समृद्धी महामार्ग हा खानदेश एक्सप्रेसवे द्वारे जळगावला सहा पदरी रस्त्याने जोडण्याच्या घोषणेमुळे जळगाव आणि नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढणार असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे .

 

प्रदर्शनाबद्दल माहिती देताना प्रदर्शनाचे समन्वयक सागर शहा म्हणाले, क्रेडाई सदस्य म्हणजे विश्वासार्ह व्यवहार असे समीकरण रुढ झाले आहे. सुमारे 28 वर्षांपासून कार्यरत क्रेडाई ही राष्ट्रीय स्तरावरील बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था असून आजमीतिला देशातील 230 शहरांतील 13000 हून अधिक बांधकाम व्यावसायिक या संस्थेसोबत जोडले आहेत.

 

जळगाव येथे आयोजित या प्रदर्शनात नाशिकचे अनेक आघाडीचे विकसक सहभागी होणार असून फ्लॅट्स ,प्लॉट्स, फार्म हाऊस, शॉप्स ऑफिसेस यांचे असंख्य पर्याय इथे उपलब्ध असतील प्रदर्शनाचा लेआउट व व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तराला साजेशी असून ग्राहकांच्या सोयीसाठी पूर्ण प्रदर्शन वातानुकूलित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

प्रदर्शनाचे सह समन्वयक अनंत ठाकरे म्हणाले नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यामुळे नाशिक मध्ये लाखो भाविक आगामी दीड वर्षाच्या कालावधीत येणार आहेत . यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीला परतावा मिळण्याची शक्यता अधिक आहे .यासोबतच विविध क्षेत्रातील उपलब्ध संधीमुळे देखील भविष्यातील गुंतवणूक म्हणजे नाशिक रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक असे म्हणणे वावगे ठरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 

या तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्सपोमध्ये नाशिक सोबतच इगतपुरी, कसारा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या भागातील अनेक पर्याय उपलब्ध राहणार असून प्रदर्शनाचे प्रायोजक म्हणून अर्बन स्टाईल्स व सहप्रायोजक म्हणून क्रिश ग्रुपने जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा यांनी दिली.

 

प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत असून प्रदर्शनाचे उद्घाटन 7 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनास अधिकाधिक जणांनी भेट द्यावी असे आवाहन क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे करण्यात आले आहे .

 

प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे आयपीपी कृणाल पाटील,उपाध्यक्ष मनोज खिवंसरा, उदय घुगे , अनिल आहेर, अंजन भालोदिया,आयपीपी कृणाल पाटील, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव नरेंद्र कुलकर्णी, सचिन बागड, हंसराज देशमुख, ऋषिकेश कोते, क्रेडाई जळगाव चे अध्यक्ष दीपक सराफ ,क्रेडाई जळगाव चे सचिव प्रशांत महाजन ,मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शाह, वृषाली हिरे, दीपाली बिरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे, सुशांत गांगुर्डे, अभिषेक महाजन,समीर सोनवणे, मनोज लाडानी, हर्षल हणमंते, भूषण कोठावदे, शिवम पटेल, हिरेन भडजा, मयुरेश चौधरी, ऋषभ तोडरवाल, क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर , सह समन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य करत आहेत.

 

बातमी शेअर करा !
Tags: क्रेडााईजळगावतीन दिवसीय प्रदर्शननासिक क्रेडााईनासिक प्रॉपर्टीनासिक मेट्रोप्रदर्शनप्रॉपर्टी एक्सपोसागर पार्क मैदान
Previous Post

मालमत्ताकर वेळेत भरल्यास दंड माफ – महापौर दीपमाला काळे

Next Post

दुर्गांचे जलसंस्कार’ छायाचित्र प्रदर्शनास जळगावात सुरुवात!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
दुर्गांचे जलसंस्कार’ छायाचित्र प्रदर्शनास जळगावात सुरुवात!

दुर्गांचे जलसंस्कार’ छायाचित्र प्रदर्शनास जळगावात सुरुवात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif