• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जिल्हा

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

चर्चांना अखेर पूर्णविराम ; गोपनीय रणनीतीनंतर भाजपचा निर्णय जाहीर; समर्थकांकडून जल्लोष !

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 31, 2026
in जिल्हा, ब्रेकिंग, विधान परिषद निवडणूक - 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अखेर नंदू (नंदकिशोर) महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विविध नावांची चर्चा सुरू असताना भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत कमालीची गोपनीयता राखत आपली रणनीती कायम ठेवली. अखेर नंदू महाजन यांची उमेदवारी निश्चित झाल्याने सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपकडून उमेदवारीसाठी अनेक दिग्गज नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. यामध्ये डॉ. केतकी पाटील, नंदू महाजन यांच्यासह उद्योजक नंदू अडवाणी, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र फडके,पाचोरा येथील पदाधिकारी अमोल शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्या नावांचीही जोरदार चर्चा होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी अखेर नंदू महाजन यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली.

दरम्यान, महायुतीतून शिवसेनेकडूनही काही नावांची चर्चा सुरू होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमीत पाटील यांच्या नावांकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्यामुळे या निवडणुकीसंदर्भात उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

नंदू महाजन हे भाजपच्या संघटनात्मक कामात सक्रिय असून रावेर परिसरात पक्षवाढीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. तसेच ते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर येताच महाजन समर्थकांनी विविध ठिकाणी जल्लोष साजरा केला. आता नंदू महाजन सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून या निवडणुकीतील पुढील राजकीय घडामोडींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजपच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून आगामी निवडणुकीत कोणती समीकरणे आकार घेतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: गुलाबराव पाटीलजलसंपदा मंत्रीनंदकिशोर महाजननिवडणूकप्रतापराव पाटीलभाजपामंत्री गिरीश महाजनविधानविधान परिषदशिवसेनाशिवसेना शिंदे गट
Previous Post

स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘स्मृती प्रवेश अभियान!

Next Post

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

"माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा" - साध्वी सोनाली दीदी करपे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif