• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home अपघात

कामावरून घरी येणाऱ्या मजुरास डंपर ने चिरडले!

कालिंका माता मंदिराजवळील घटना; पोलिसांनी डंपर घेतला ताब्यात ; अप्पर पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोलीस दाखल 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 13, 2026
in अपघात, जळगाव, ब्रेकिंग
कामावरून घरी येणाऱ्या मजुरास डंपर ने चिरडले!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

कालिंका माता मंदिराजवळ मजुरास डंपर ने चिरडले

 

पोलिसांनी डंपर घेतला ताब्यात ; अप्पर पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोलीस दाखल

 

जळगाव – जुने जळगाव परिसरातील जुना भुसावल हायवे वरील कालीका माता मंदिराजवळ कामावरून घरी येणाऱ्या मजुरास डंपरने चिरडले यामध्ये जुने जळगाव तेली चौकातील प्रभाकर रघुनाथ पाटील ( अहिरे ) वय वर्ष ५६ हे जागीच ठार झाले. असून ही घटना १३रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. त्यांच्या कुटुंबीयांना ही बातमी कळताच त्यांनी एकच आक्रोश केला.

 

या परिसरात ही तिसरी घटना असून , या ठिकाणी सिग्नल बसवलेले तर आहे.परंतु या ठिकाणी वाहतूक शाखेचा पोलीस तैनात नसल्याने ही सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरत आहे.

यामुळे या परिसरात पोलीस प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

याच ठिकाणी गेला तिसरा….

सात आठ महिन्यापूर्वी याच ठिकाणी इयत्ता नववी शिकणारा विद्यार्थी सायकलवरून जात असताना त्यास डंपरने चिरडले होते त्यावेळी त्या डंपरला संतप्त नागरिकांनी आग लावून पेटवण्यात दिला होता. तर त्यानंतर एका वृद्धाला देखील याच ठिकाणी डम्परणे चिरडलं होते. त्यानंतर या ठिकाणी सिग्नल बसवण्यात आले मात्र हे सिग्नल बसल्यानंतर काही दिवसातच बंद होते व आज या बंद अवस्थेत असलेल्या सिग्नलमुळेच व या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस यंत्रणा नसल्याने ही घटना घडली आहे.

या ठिकाणी हा तिसरा अपघात आहे त्यावेळी आम्ही या ठिकाणी सिग्नल बसवण्याची मागणी केली होती तसेच या ठिकाणी गतिरोधक देखील लावण्याची मागणी केली होती या ठिकाणी सिग्नल लावण्यात आले आहे मात्र हे कधी चालू तर कधी बंद अवस्थेत असतात मग अशा सिग्नलचा काय उपयोग हे यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे माजी उपमहापौर व भाजपाचे नगरसेवक सुनील खडके यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

 

कालिंका माता परिसर आता अतिशय संवेदनशील ठरत आहे या ठिकाणी कधी गोळीबार होतो. तर कधी चाकू मारून खून केला जातो तर एक्सीडेंट चे प्रकार येथे वारंवार घडत असतात. यापूर्वी देखील एक लहान मुलगा व एका वृद्धास डंपरने चिरडले होते. व त्याचे पुन्वृत्ती आज झाली आहे. या परिसरात पोलीस स्टेशन नाही तसेच या ठिकाणी सिग्नल यंत्रणेवर वाहतूक शाखेचे नियंत्रण नाही व या ठिकाणी एकही वाहतूक शाखेचा कर्मचारी दिसत नाही त्यामुळे आता किती बळी जाणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते ललित विजय नारखेडेसह येथील उपस्थित नागरिकांनी प्रशासनाला केला आहे.

बातमी शेअर करा !
Tags: कालिंका माता परिसरघटनास्थळी पोलिसांची धावजुने जळगाव परिसरातील घटनानागरिकांचा संतापया परिसरात तिसरी घटना
Previous Post

यंदा शिवजयंतीची शोभायात्रा डीजे-गुलाल विरहित!

Next Post

रामेश्वर कॉलनीत भीषण आग, २० ते २५ दुचाकी जळून खाक!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
रामेश्वर कॉलनीत भीषण आग, २० ते २५ दुचाकी जळून खाक!

रामेश्वर कॉलनीत भीषण आग, २० ते २५ दुचाकी जळून खाक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif