• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव खान्देश सेंट्रल येथे आयटी एक्सपो 2026 चे आयोजन

जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य 'आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६'

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 13, 2026
in जळगाव, वाणिज्य वार्ता
जळगाव खान्देश सेंट्रल येथे आयटी एक्सपो 2026 चे आयोजन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव, (प्रतिनिधी) : माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांची ओळख करून देण्यासाठी ‘जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटना’ (JJITA) तर्फे ‘JJITA IT आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. हा एक्स्पो दि. १३, १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे पार पडणार असून, याद्वारे जळगावकरांना आधुनिक तंत्रज्ञान जवळून अनुभवता येणार आहे.

 

या तीन दिवसीय प्रदर्शनात साधारण ३० स्टॉल्स असून सीसीटीव्ही कॅमेरे, अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली, आयटी सोल्यूशन्स आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचे स्टॉल्स असणार आहेत. उद्योग क्षेत्रातील दिग्गज, नवोन्मेषक आणि धोरणकर्ते एकाच छताखाली येणार असून, उपस्थितांना थेट प्रात्यक्षिके (Live Demos) पाहण्याची आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

 

दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष सुनील घोलप, सचिव सुरेंद्र मेहंदळे यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे बदल सर्वसामान्यांपर्यंत आणि व्यावसायिकांपर्यंत पोहोचावेत, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या पत्रकार परिषदेला सदस्य योगेश चौधरी, विनोद सोनार, निलेश जैन, संदीप राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते. जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि व्यावसायिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अत्याधुनिक सुरक्षाआयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६'खान्देश सेंट्रल मॉलतज्ज्ञांशी संवादतीन दिवसीय प्रदर्शनसीसीटीव्ही कॅमेरे
Previous Post

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक पाटील!

Next Post

यंदा शिवजयंतीची शोभायात्रा डीजे-गुलाल विरहित!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
यंदा शिवजयंतीची शोभायात्रा डीजे-गुलाल विरहित!

यंदा शिवजयंतीची शोभायात्रा डीजे-गुलाल विरहित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif