• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये 'तुतारी'चा जयघोष

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 5, 2026
in Uncategorized, जळगाव, निवडणूक, महापालिका रणसंग्राम
छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ६ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शाहू महाराज नगरातील तपस्वी हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली.

 

ढोल-ताशांच्या गजरात आणि महिलांच्या औक्षणाने स्वागत

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एजाज मलीक यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात प्रचाराला सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी उमेदवारांनी छत्रपती शाहू महाराज नगर, हौसिंग सोसायटी, दत्त कॉलनी, इंदिरा नगर आणि खान्देश मील कॉलनी परिसरात झंझावाती पदयात्रा काढली. यावेळी परिसरात चैतन्याचे वातावरण दिसून आले. अनेक ठिकाणी गृहिणींनी उमेदवारांचे औक्षण करून आणि पेढा भरवून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.

 

प्रभाग ६ चे ‘तुतारी’चे शिलेदार

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने प्रभाग ६ मधून पाटील हेतल महेंद्र (प्रभाग ६ अ), प्रेरणा रामेश्वर मिश्रा (प्रभाग ६ ब), तनवीर अब्दुल राशिद शेख (प्रभाग ६ क), किरण लक्ष्मण राजपूत (प्रभाग ६ ड) या उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे.

 

मतदारांना केले आवाहन, उद्याचे नियोजन

उमेदवारांनी “तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटण दाबून विकासाला साथ द्या,” असे आवाहन मतदारांना केले आहे. प्रचाराचा हा वेग कायम राखत, उद्या सोमवार रोजी सकाळी निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा शुभारंभ होणार आहे. शहरातील ऐतिहासिक ‘चिमुकले श्रीराम मंदिर’ येथे नारळ फोडून उद्याच्या प्रचाराची सुरुवात केली जाईल, अशी माहिती पक्ष प्रतिनिधींनी दिली आहे.

 

मतदान १५ जानेवारीला

जळगाव महानगरपालिकेसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. प्रभागातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाचे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मैदानात उतरल्याने प्रभाग ६ मध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #राष्ट्रवादीकाँग्रेस #SharadPawar #तुतारी #Tutari #ElectionCampaign #JalgaonNews #JalgaonPolitics #MunicipalElection #ChhatrapatiShahuMaharajNagar #NavrajyaLive
Previous Post

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज पिंप्राळ्यात

Next Post

भवानी मातेच्या चरणी नारळ वाढवून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ ! 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भवानी मातेच्या चरणी नारळ वाढवून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ ! 

भवानी मातेच्या चरणी नारळ वाढवून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif