• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

भवानी मातेच्या चरणी नारळ वाढवून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ ! 

पिंप्राळा येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणांनी प्रचार सभा दणाणली.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 5, 2026
in जळगाव, निवडणूक, महापालिका रणसंग्राम
भवानी मातेच्या चरणी नारळ वाढवून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ ! 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – (चिफ एडिटर )जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली असून आज पासून भारतीय जनता पार्टीने जळगाव महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ पिंप्राळा येथील भवानी माता मंदिरात नारळ वाढवून केला. भाजप प्रदेशाध्यक्ष आ रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी. मंत्री संजय सावकारे आ.किशोर आप्पा पाटील आ. राजू मामा भोळे आदी उपस्थित होते.

 

पिंप्राळा येथील भवानी मंदिर येथून महायुतीच्या ७५ उमेदवारांचे प्रचाराचे नारळ वाढवून लगेचच प्रचंड जाहीर सभा घेण्यात आली. या प्रसंगी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन मंत्री संजयजी सावकारे,खा स्मिताताई वाघ,माजी मंत्री गुलाबराव देवकर,आ सुरेश भोळे, आ मंगेश चव्हाण आ किशोर अप्पा पाटील,आ अमोल जावळे,आ अमोल पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार RPI आठवले गट अनिल अडकमोल तसेच महायुतीचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

यावेळी भाजपाचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपाने केलेल्या विकास कामांचा आढावा भाषणातून दिला त्याचबरोबर केंद्रात मोदी सरकारने केलेला विविध विकासकामे व आणलेले कायदे ३७० कलम,अयोध्या येथील राम मंदिर,तीन तलाक यावर सविस्तर मार्गदर्शन केले. व तुफान फटकेबाजी करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसे पाहता माझी सभेला येण्याची गरजही नव्हती कारण या ठिकाणी संकटमोचन गिरीश महाजन यांनी या आधीच ग्राउंड तयार करून ठेवलेले आहे. व जळगाव शहराचा खऱ्या अर्थाने चेहरा मोहरा बदलायचा असेल तर महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करा व दिलेल्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले.

 

१५० कोटी रुपयांच्या भरीव निधीने जळगाव शहराचा विकासात हातभार, 

जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी १५० कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला व त्या माध्यमातून रस्ते गटारी रेल्वे उड्डाणपूल हायवेचे उड्डाणपूल पथदिवे यासह विविध विकासकामे केलेली आहेत व उर्वरित विकास काम करण्यासाठी पुन्हा महायुतीला महापालिकेत सत्तेत आणा असे आवाहन आमदार भोळे यांनी यावेळी केले.

 

छत्रपती शिवाजी महाराज चौक पिंप्राळा येथे प्रचंड जाहीर सभा येथे पार पडली. महायुतीच्या ७५ उमेदवार ,व भाजप, शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी काँग्रेस अ पवार , RPI आठवले गट सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व तमाम जनता उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल त्रिपाठी यांनी केले.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

Next Post

आजच्या लेकी… उद्याच्या सावित्रीबाई!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आजच्या लेकी… उद्याच्या सावित्रीबाई!

आजच्या लेकी… उद्याच्या सावित्रीबाई!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif