• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

गो… “खान्देश रन” मध्ये धावले जळगावकर…

एसपींनी दाखवली हिरवी झेंडी ; २५०० धावपटूंचा स्पर्धेत सहभाग

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 29, 2025
in Uncategorized, जळगाव, जिल्हा, मॅरेथॉन
गो… “खान्देश रन” मध्ये धावले  जळगावकर…
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव रनर्स ग्रुपच्या वतीने आज सागर पार्क, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या खान्देश रन (मॅरेथॉन) ला धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत ३, ५, १० व २१ किलोमीटरसाठी सुमारे २५०० धावपटूंनी सहभाग नोंदवला. खान्देश रनच्या सुरुवाती प्रसंगी २१ किलोमीटरसाठी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जैन इरिगेशनचे अशोक जैन, अतुल जैन व अथांग जैन, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, सुप्रीम इंडस्ट्रीजचे सुरेश मंत्री, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उद्योजक मनोज अडवाणी, राजेश चोरडिया तसेच जळगाव रनर्स ग्रुपचे अध्यक्ष किरण बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला अधिकृत सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान लोकेश साळुंखे, सागर सोनवणे व याशिका किनाडा यांनी मनोरंजनातून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. आयोजनाची जबाबदारी जळगाव रनर्स ग्रुपने  सांभाळली.

या यशस्वी आयोजनासाठी जळगाव रनर्स ग्रुपच्या सुमारे १०० सदस्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने मेहनत घेतली. नियोजन, मार्गदर्शन, सुरक्षितता, पाणीपुरवठा, वैद्यकीय सेवा व स्वयंसेवकांचे व्यवस्थापन यामुळे खान्देश रन अत्यंत शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पडली. खान्देश रनच्या माध्यमातून आरोग्य, फिटनेस आणि धावण्याची संस्कृती रुजवण्याचा संदेश देण्यात आला असून, या स्पर्धेमुळे जळगाव शहराची क्रीडाक्षेत्रातील ओळख अधिक भक्कम झाली आहे.

खान्देश रन – २०२५ अंतिम निकाल

१० कि.मी. महिला गट (वयोगट १८ ते ४०)

1. रिंकी पावरा – ४१ मिनिटे १० सेकंद

2. पूजा लोधी – ४९ मिनिटे ५३ सेकंद

3. नंदा तायडे – १ तास १ मिनिट ८ सेकंद

—————————————

१० कि.मी. पुरुष गट (वयोगट १८ ते ४०)

1. तेजस सपकाळे – ३४ मिनिटे १५ सेकंद

2. दिनेश वसावे – ३४ मिनिटे ३३ सेकंद

3. संदीप वडावी – ३५ मिनिटे ७ सेकंद

⸻———————————–

१० कि.मी. महिला गट (वयोगट ४१ ते ९९)

1. वैशाली बडगुजर – १ तास ३ मिनिटे ११ सेकंद

2. सायली बेडांळे – १ तास ६ मिनिटे ११ सेकंद

3. गरिमा न्याती – १ तास ९ मिनिटे २९ सेकंद

⸻———————————-

१० कि.मी. पुरुष गट (वयोगट ४१ ते ९९)

1. राम लिंभरे – ४२ मिनिटे ५४ सेकंद

2. युवराज सूर्यवंशी – ४९ मिनिटे १८ सेकंद

3. नागोराव भोयर – ४९ मिनिटे ३० सेकंद

⸻———————————

२१ कि.मी. महिला गट (वयोगट १८ ते ४०)

1. शिवानी चौरसिया – १ तास ३० मिनिटे ४३ सेकंद

2. निकिता साहू – १ तास ३९ मिनिटे ५६ सेकंद

3. ऋतुजा मडावी – १ तास ४५ मिनिटे ४८ सेकंद

⸻————————————

२१ कि.मी. पुरुष गट (वयोगट १८ ते ४०)

1. अजय वसावे – १ तास १६ मिनिटे ४८ सेकंद

2. आसू बारेला – १ तास २३ मिनिटे ९ सेकंद

3. जयेश चौधरी – १ तास २३ मिनिटे ११ सेकंद

⸻————————————–

२१ कि.मी. महिला गट (वयोगट ४१ ते ९९)

1. रती महाजन – २ तास १० मिनिटे ६ सेकंद

2. शोभा यादव – २ तास १० मिनिटे ३० सेकंद

3. विद्या बेडांळे – २ तास १६ मिनिटे ३७ सेकंद

⸻———————————-

२१ कि.मी. पुरुष गट (वयोगट ४१ ते ९९)

1. मनावर बराई – १ तास २३ मिनिटे ८ सेकंद

2. मल्लिकार्जुन पारदे – १ तास २५ मिनिटे ९ सेकंद

3. भास्कर लांडगे – १ तास ३१ मिनिटे ५० सेकंद

बातमी शेअर करा !
Tags: #खान्देशरण #JalgaonMarathon #KhandeshRun2025 #JalgaonRunners #SagarParkJalgaon #MarathonJalgaon #खान्देशमॅरेथॉन #SportsJalgaon #धावपटू
Previous Post

महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले.

Next Post

स्वातंत्र्य चौकातून पत्रकाराची दुचाकी लंपास 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
स्वातंत्र्य चौकातून पत्रकाराची दुचाकी लंपास 

स्वातंत्र्य चौकातून पत्रकाराची दुचाकी लंपास 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif