• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले.

शिवसेनेकडे ३८, राष्ट्रवादीकडे ३७ जागा..! चर्चा झाल्यास मनसे, काँग्रेसलाही सामावून घेणार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 28, 2025
in Uncategorized, जळगाव, ब्रेकिंग, महापालिका रणसंग्राम
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव प्रतिनिधी – येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमधील घटक शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची सकारात्मक चर्चा झाली असून एकत्र निवडणूक लढणार आहेत. यामध्ये शिवसेनेला ३८ तर राष्ट्रवादीला ३७ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये दोन्ही पक्ष हे मनसे आणि काँग्रेसला सामावून घेणार असल्याची माहिती दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकीकडे भारतीय जनता पक्षातर्फे जागावाटप सूत्राबाबत अस्थिर वातावरण दिसून आले. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला भाजपने अखेरपर्यंत झुलवत ठेवले. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीने रविवारी २८ डिसेंबर रोजी घेतलेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा केली. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला ३८ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ३७ जागा देण्याबाबत आता एकमत झाले आहे.

 

पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवडणूक प्रभारी माजी आ. संतोष चौधरी, महानगराध्यक्ष एजाज मलिक, कार्याध्यक्ष संग्राम सूर्यवंशी, शिवसेना ठाकरे गटातर्फे संपर्क नेते संजय सावंत, माजी खा.उन्मेष पाटील, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करणदादा पवार, पीयूष गांधी उपस्थित होते. आम्ही एकत्रितपणे जागा लढवणार असून शिवसेना त्यांच्या कोट्यातून मनसेला तर राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांच्या कोट्यातून काँग्रेस व इतर समविचारी पक्षांना तिकीट देणार असल्याचीही माहिती देण्यात आली.

 

तसेच जळगाव महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार असल्याचा आम्हाला विश्वास असून महापौर आमच्याच महाविकास आघाडीचा राहील अशी माहिती देखील पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेमधून महाविकास आघाडीचे नेत्यांचा आत्मविश्वास दिसून आला आहे. त्यामुळे आता संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडीची यादी जाहीर होण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

महानगरपालिकेत भाजपा लढणार स्वबळावर ?

Next Post

गो… “खान्देश रन” मध्ये धावले जळगावकर…

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गो… “खान्देश रन” मध्ये धावले  जळगावकर…

गो... "खान्देश रन" मध्ये धावले जळगावकर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif