• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

महानगरपालिकेत भाजपा लढणार स्वबळावर ?

मंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून गेले उठून : मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 28, 2025
in Uncategorized, जळगाव, निवडणूक, ब्रेकिंग, महापालिका रणसंग्राम
महानगरपालिकेत भाजपा लढणार स्वबळावर ?
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. रविवारी दि. २८ डिसेंबर रोजी सकाळपासून अजिंठा विश्रामगृह येथे सुरू असलेल्या महायुती बैठकीमध्ये एकत्र येण्याची चर्चा आता फिस्कटलेली आहे. भाजप स्वबळावर लढणार असल्याचे आता चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. ना.गिरीश महाजन कार्यालयाकडे रवाना झाले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून अर्धवट उठून निघून गेल्याची खात्रीलायक माहिती मिळालेली आहे.

भारतीय जनता पक्ष हा महायुती सोबत लढेल असे काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रभारी आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले होते. मात्र शनिवारी ना. गिरीश महाजन यांनी सांगितले की, आम्ही युती संदर्भात चर्चा करत आहोत.रविवारी मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण, आ.राजूमामा भोळे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्ये अजिंठा विश्राम येथे चर्चा झाली.

चर्चामध्ये शिवसेनेकडून २५ जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र भाजपकडून शिवसेनेला १९ आणि राष्ट्रवादीला ६ अशा जागा देण्याबाबत सांगण्यात आले. शिवसेनेच्या आज २५ “विनिंग सीटा” असल्यामुळे शिवसेना कडून हा प्रस्ताव अमान्य करण्यात आला आहे. त्यामुळे आता महायुती फीस्कटल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

अपेक्षित जागा मिळत नाही म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बैठकीतून अर्धवट उठून निघून गेले. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी चर्चा करून जागा वाटपाबाबत व तिकीट वाटताबाबत अंतिम चर्चा केली. यानंतर मंत्री गिरीश महाजन हे पुढील दाराने तर आ. मंगेश चव्हाण आणि आ. राजूमामा भोळे हे मागील दाराने विश्रामगृहातून कोणालाही न भेटता थेट निघून गेले. भाजप ७५ जागा स्वबळावर लढणार असल्याचे आता जवळजवळ स्पष्ट झालेले आहे. मंत्री गिरीश महाजन हे कार्यालयातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे भेटी घेऊन आता रेल्वेने नाशिककडे रवाना झाले आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांना सायंकाळपर्यंत माहिती देण्यात येणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून मिळाली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #जळगावमहायुतीफिस्कटली #जळगावमहापालिकानिवडणूक #भाजपस्वबळावर #गिरीशमहाजन #गुलाबरावपाटील #JalgaonPolitics #Mahayuti #BJPJalgaon #ShivsenaJalgaon #NCPJalgaon #जळगावराजकारण #जागावाटपविवाद
Previous Post

महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे 25 अर्ज दाखल

Next Post

महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले.

महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif