• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

अखेर शिवसेना (उबाठा) – मनसे युती जाहीर

कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा”;  वरळी येथे पत्रकार परिषदेत राज व उद्धव ठाकरे यांनी केली युतीची घोषणा 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 24, 2025
in Uncategorized, ब्रेकिंग, महाराष्ट्र
अखेर शिवसेना (उबाठा) – मनसे युती जाहीर
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

मुंबई : बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेकडून अपेक्षित असलेली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर जाहीर झाली आहे. ही युती मुंबईतील वरळी सी-फेस येथील हॉटेल ब्ल्यू सी (Hotel Blue Sea) येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.

या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “कुठल्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे” असे सांगत युतीची अधिकृत घोषणा केली. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरतेचे वातावरण असून काही राजकीय शक्ती राज्याच्या हिताऐवजी स्वार्थासाठी काम करत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी ही युती आवश्यक होती.

“ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनता अनेक दिवसांपासून करत होती, ती युती आज जाहीर होत आहे. मुंबईचा महापौर मराठीतच होणार,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “ठाकरे घराण्याने मुंबई आणि महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आहे. मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला. आज आपण जर आपसात भांडत राहिलो, तर ज्यांनी या भूमीसाठी बलिदान दिले, त्या हुतात्म्यांचा अपमान होईल.”

उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, “मुंबई किंवा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, संघर्षातून मुंबई आणि महाराष्ट्र मिळवला आहे. मुंबईचे लचके तोडण्याचे, महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे काहींचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत.”

या युतीच्या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड मानली जात असून, विशेषतः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

बातमी शेअर करा !
Tags: #ShivSenaMNSAlliance #UBT_MNS #ThackerayBrothers #MaharashtraPolitics #MumbaiPolitics #MarathiAsmita #RajThackeray #UddhavThackeray #PoliticalAlliance
Previous Post

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ.एन.के.कृष्णकुमार

Next Post

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif