• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

इच्छुकांच्या “भाऊ गर्दीने” भाजप कार्यालय फुलले

रस्त्याने वाहनांच्या रांगाच रांगा.; रात्री 1 वाजेनंतरही चालल्या मुलाखती.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 16, 2025
in Uncategorized, जळगाव, निवडणूक, महापालिका रणसंग्राम
इच्छुकांच्या “भाऊ गर्दीने” भाजप कार्यालय फुलले
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगाव शहर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या जळगाव शहर कार्यालयात आज उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले. मुलाखतीची वेळ सकाळी 11 वाजेपासून होती मात्र काही कारणास्तव ही वेळ दुपारी 2 वाजेची करण्यात आली.तरी देखील इच्छुक याठिकाणी थांबलेले होते. दुपार पासून इच्छुकांची मोठी गर्दी या ठिकाणी वाटत होती. यात प्रभागनिहाय मुलाखती घेण्यात आल्याने मुलाखती सुरू होत्या तर एक एक प्रभाग मधून 40 ते 50 लोक इच्छुक होते त्यामुळे 75 जागेसाठी 450 ते 550 च्या वर अर्ज प्राप्त झाल्याचा अंदाज असून रात्री 1 वाजे नंतरही सात-आठ लोक मुलाखतीसाठी थांबून होते. भाजप कार्यालय परिसरात वाहनांच्या रांगा तसेच जत्रेचे स्वरूप आले होते. .

 

 

भाजप कार्यालयात दिग्गजांसह आजी-माजी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज सादर करत पक्षाकडे संधी देण्याची मागणी केली. आजच्या मुलाखतींसाठी शहरातील विविध प्रभागांतून माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला तसेच नव्या चेहऱ्यांनी हजेरी लावली होती. अनेकांनी आपल्या कार्याचा आढावा, प्रभागातील समस्या, विकासाची दृष्टी व पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न याबाबत माहिती दिली.

 

यांनी घेतल्या मुलाखती

मंत्री संजय सावकारे, आ.राजूमामा भोळे, माजी महापौर नितीन लढा, दीपक सूर्यवंशी, नितीन इंगळे, राहुल वाघ यांच्या उपस्थितीत ही मुलाखत प्रक्रिया पार पडली. उमेदवारांची सामाजिक प्रतिमा, संघटन कौशल्य, पक्षनिष्ठा, निवडणूक जिंकण्याची क्षमता आणि प्रभागातील जनसंपर्क यावर भर देण्यात आला. तसेच महिला व युवकांना संधी देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

अनेक प्रभागांतून एकाहून अधिक इच्छुक असल्याने अंतिम उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही प्रभागांत तर दिग्गज नेत्यांसह नवोदित उमेदवारांनीही जोरदार दावा केल्याने पक्ष नेतृत्वासमोर योग्य तोडगा काढण्याचे आव्हान उभे राहिले आहे. तर काहींनी आपली उमेदवारी निश्चित झाल्याचे काहींनी बोलून दाखवले मात्र पक्षाचे तिकीट कोणाला मिळते हे येत्या काही दिवसातच समजणार आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

महानगरपालिका निवडणूकीचा बिगुल वाजला

Next Post

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif