• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेचा सन्मान…

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दीपस्तंभ मनोबलमध्ये तीन दिवसीय उपक्रमांचे आयोजन*

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 3, 2025
in Uncategorized, जळगाव, जिल्हा, सामाजिक
दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेचा सन्मान…
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव | 3 डिसेंबर 2025

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दीपस्तंभ मनोबल प्रकल्पात तीन दिवसीय शैक्षणिक, जनजागृती आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समावेशक शिक्षण, संवेदनशीलता आणि सामाजिक सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमांत शैक्षणिक संस्था, स्क्राईब्स (लेखनिक), स्वयंसेवक आणि नागरिकांचा व्यापक सहभाग मिळाला.

 

एम. जे. कॉलेज, नोबल क्लासेस, गोदावरी मेडिकल कॉलेज आणि संकल्प क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसला भेट देत प्रशिक्षण प्रक्रिया, सहाय्यक तंत्रज्ञान व कौशल्यविकास उपक्रमांची माहिती घेतली. शकुंतला हायस्कूल, बहिणाबाई माध्यमिक विद्यालय आणि गोदावरी इंजिनीरिंग कॉलेज येथे आयोजित जागरूकता व डेमो सत्रांत दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतांबद्दल आणि समावेशक समाजनिर्मितीच्या गरजेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

 

तसेच गोविंदा कोळी सरांच्या माध्यमातून उपस्थित 20 स्क्राईब्सचा सन्मान करून प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली; हर्षदीप घुगे सरांनी स्क्राईब्स(लेखनिक) व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संवाद सत्र घेतले. समाजातील विविध घटकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आयोजित रक्तदान शिबिरात एकूण 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

उपक्रमांचा समारोप दिव्यांग विद्यार्थ्यांच्या “दिव्य पहाट” या सांस्कृतिक सादरीकरणाने झाला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी भूपाळी, भजन आणि भक्तिगीते सादर करत आपल्या कलात्मकतेची व आत्मविश्वासाची झलक दाखवली; Disability प्रतीकांवर आधारित रंगोळीने क्षमतेकडे पाहण्याचा सकारात्मक संदेश दिला. कार्यक्रमात मारोती पोटे सर व मुकुंद गोसावी यांनी मानसिक सामर्थ्य, स्वावलंबन आणि समाजाने दिव्यांग व्यक्तींना स्वीकार देण्याच्या गरजेबाबत मार्गदर्शन केले.

 

या तीन दिवसीय उपक्रमांमधून दिव्यांग विद्यार्थी, स्वयंसेवक आणि युवक यांच्या सहभागाने समावेशक शिक्षणाची मूल्ये अधिक दृढ झाली. दीपस्तंभ मनोबलच्या मते, दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतांचा सन्मान आणि समान संधींचे वातावरण निर्माण करणे ही सामूहिक सामाजिक जबाबदारी असून, या उपक्रमांनी त्या दिशेने अर्थपूर्ण पाऊल टाकले आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

जलपर्णीपासून बनवल्या उपयोगी साड्या

Next Post

कवयीत्री बहिणाबाई चौधरी उद्यानाचे लवकरच सुशोभीकरण.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
कवयीत्री बहिणाबाई चौधरी उद्यानाचे लवकरच सुशोभीकरण.

कवयीत्री बहिणाबाई चौधरी उद्यानाचे लवकरच सुशोभीकरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif