• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

वंदे मातरम् गीत हा आपला स्वाभिमान – ना. गिरीश महाजन 

वंदे मातरम् रॅलीने राष्ट्रभक्तीचा जागर ; डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयात समारोप 

NAVARAJY TEEM by NAVARAJY TEEM
November 7, 2025
in Uncategorized
वंदे मातरम् गीत हा आपला स्वाभिमान – ना. गिरीश महाजन 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

जळगाव- जगात असा एकमेव आपला भारत देश आहे, ज्याला आपण आईचे स्वरूप दिले आहे. भारतमातेचे वर्णन करणारे गीत वंदे मातरम् हा केवळ उत्सव नसून तो आपला प्रत्येकाचा स्वाभिमान असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

बंकीमचंद्र चट्टोपाध्याय लिखीत वंदे मातरम् या राष्ट्रगीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीतर्फे जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानापासून छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणावर झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, आमदार अमोल जावळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, पूर्वचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस (पूर्व) डॉ. केतकी पाटील, गोदावरी फॉउंडेशन सचिव डॉ.वर्षा पाटील, परिक्षत बर्‍हाटे, राकेश पाटील, निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा दूध संघाच्या संचालिका भैरवी पलांडे, वैशाली सूर्यवंशी, प्रदेश पदाधिकारी अजय भोळे, सुरेश धनके, अशोक कांडेलकर, मार्केटिंग फेडरेशनचे रोहीत निकम, पोपटतात्या भोळे, राजेंद्र घुगे, जिल्हा संघटन महामंत्री राजेंद्र सोनवणे, कार्यालय मंत्री गणेश माळी, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.

त्यानंतर स्नेहल विसपुते यांच्या समवेत उपस्थितांनी सामुहिक वंदे मातरम् गीत म्हटले. मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, देशावर जेव्हा ब्रिटीशांचे राज्य होते, तेव्हा स्वांतत्र्य मिळण्याचे स्वप्न अनेक क्रांतिकारकांनी पाहिले होते. या स्वप्नांमध्ये स्फुरण भरण्यासाठी बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम् हे गीत लिहीले. भारतमातेचे वर्णन करणार्‍या या गीताने स्वातंत्र्याच्या लढ्यात मोठी भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. शिरीषकुमारसारख्या बालकाने छातीवर गोळ्या झेलल्या.

आज अशा क्रांतीकारकांच्या बलिदानामुळेच आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने या राष्ट्रगीताचा सन्मान हा राखलाच पाहिजे. भारतभूमी ही काही जमीन नाही तर ती आपली माता आहे. या मातेचे सुरेख वर्णन करणार्‍या या वंदे मातरम् गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचे ना. गिरीश महाजन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहे. ११ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकावर आली आहे. २०४७ पर्यंत भारत हा विश्वगुरू होईल. देशात फायटर जेट, बुलेट ट्रेन, वंदे भारत ट्रेन अशा सुपरफास्ट सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सगळ्याच क्षेत्रात देशाची प्रगती होत आहे. त्यामुळे देशाप्रती आपल्याला आदर असलाच पाहीजे असेही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

वंदे मातरम् हे गीत उर्जा देणारे – ना. सावकारे

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की, वंदे मातरम् हे गीत स्वातंत्र्याला नवी दिशा देणारे ठरले आहे. शालेय जीवनापासून आपण हे गीत म्हणत आलो आहे. त्यामुळे हे गीत म्हणजे राष्ट्राप्रती आणि मातृभूमीप्रती एक आदराची भावना असल्याचे ना. संजय सावकारे यांनी सांगितले.

सामुहिक वंदे मातरम् गीताने जागविली राष्ट्रचेतना

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणावर वंदे मातरम् या गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सामुहिक वंदे मातरम् गीत म्हटले गेले. कार्यक्रमाला उपस्थित तीन हजाराहून अधिक विद्यार्थी आणि मान्यवरांकडून गीत सादर होतांना राष्ट्रचेतना जागृत झाल्याचा प्रत्यय आला होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपाचे जळगाव पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

यांची होती उपस्थिती

या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन प्रशांत सोळंके, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एच. पाटील, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, वैद्यकीय रूग्णालयाचे सीईओ विजय बाविस्कर, राहुल गिरी, प्रवीण कोल्हे, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन वैद्य हर्षल बोरोले, चेतन चौधरी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक चौधरी, शैलेश तायडे, डॉ. पी.आर सपकाळे, होमीओपॅथी महाविद्यालयाचे रजीस्ट्रार राजू जामोदकर, रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड यांच्या महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

बातमी शेअर करा !
Previous Post

संतज्ञानेश्वर विद्यालय मध्ये विद्यार्थी दिन साजरा

Next Post

जळगावकरांना लावावे लागणार मास्क..

Next Post
जळगावकरांना लावावे लागणार मास्क..

जळगावकरांना लावावे लागणार मास्क..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्राइम पेट्रोल मालिकेतून घेतला गुन्हेगारीचा धडा..

क्राइम पेट्रोल मालिकेतून घेतला गुन्हेगारीचा धडा..

November 30, 2025
समाज बदलविण्यासाठी क्रांतिकारी विचारांची आवश्यकता.

समाज बदलविण्यासाठी क्रांतिकारी विचारांची आवश्यकता.

November 29, 2025
ट्रॅव्हल्सचा निष्काळजीपणा : मध्यरात्री 31 प्रवासी अडचणीत

ट्रॅव्हल्सचा निष्काळजीपणा : मध्यरात्री 31 प्रवासी अडचणीत

November 29, 2025
राष्ट्रवादी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन .

राष्ट्रवादी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन .

November 28, 2025
उद्योजकअल्पेश देवरेंनी दिल्या विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रतीभेट

उद्योजकअल्पेश देवरेंनी दिल्या विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रतीभेट

November 27, 2025
संविधान दिवसानिमित्त विविध उपक्रम सादर

संविधान दिवसानिमित्त विविध उपक्रम सादर

November 26, 2025
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif