नवराज्य live न्यूज नेटवर्क
जळगाव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी जिल्हा परिषद, सातारा संचलित प्रतापसिंह हायस्कूल या शाळेत प्रवेश घेवून शिक्षणाची सुरुवात केली. त्या प्रित्यर्थ शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज 7 रोजी विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली.
विद्यार्थी दिनानिमित्त शाळेमध्ये अंकिता फुलचंद्र यादव व खुशी ज्ञानेश्वर मोरे या विद्यार्थिनींनी वकृत्व सादर केले व काव्यवाचन तरन्नुम मुस्ताक तडवी ,रितिका छगन पाटील, या विद्यार्थिनी काव्यवाचन केले. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी गणित मंडळामधील प्रतिनिधी अमित तडवी याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.







