• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जिल्हा

अमळनेर तालुक्यात २२ हजार ९५९ संभाव्य दुबार मतदार

नगरपालिकेत २३२९ हरकती मान्य तर ११३४हरकती फेटाळल्या

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 1, 2025
in जिल्हा, निवणूक
अमळनेर तालुक्यात २२ हजार ९५९ संभाव्य दुबार मतदार
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात १७ हजार ९११ तर शहरी भागात ५ हजार ४८ असे एकूण २२ हजार ९५९ मतदार संभाव्य दुबार मतदार म्हणून राज्य निवडणूक आयोगाला निष्पन्न झाले आहेत. या मतदारांची खात्री करणे सुरू झाले आहे.

निवडणूक आयोगानेच संभाव्य दुबार मतदार शोधून काढले असून त्यांच्या नावांसह यादी महसूल विभागाला पाठवण्यात आल्या आहेत. यात पंचायत समिती जिल्हा परिषद अंतर्गत निवडणूक विभाग ३४ ते ६८ व निर्वाचक गण ६७ ते ७६ मध्ये १७ हजार ९११ मतदार संभाव्य दुबार म्हणून आढळले आहेत. तर शहरात ५०४८ मतदार संभाव्य दुबार आहेत. आयोगाने फक्त नावे आणि आकडे दिल्याने आता कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे की नेमक्या कोणत्या मतदार संघात दुबार नावे आहेत.

ही नावे शोधून आता बी एल ओ मार्फत पडताळणी केली जाणार आहे. यात अनेक ठिकाणी एकाच नावाची दोन किंवा जास्त व्यक्ती असू शकतात किंवा काहींची नावे दोन ठिकाणी आहेत. सध्या शाळांना सुट्या असल्याने बी एल ओ सुटीवर आहेत. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

एकाच मतदारांचे नाव दोन ठिकाणी असल्यास तो मतदार नेमक्या कोणत्या ठिकाणी मतदान करेल याबाबत बी एल ओ परिशिष्ट एक त्याच्याकडून भरून घेतील त्यानंतर संबंधित मतदाराबाबत त्या याद्यांवर शिक्का मारला जाईल. परिणामी मतदान कर्मचाऱ्यांना तो कुठे मतदान करू शकतो याची माहिती असेल म्हणजे दुबार मतदान होणार नाही. मात्र स्थानिक महसूल प्रशासनाला दुबार मतदारांचे नाव मतदार यादीतून कोणत्याही एका ठिकाणाहून काढण्याचे अधिकार नाहीत. मतदाराने संमती दिल्यावरच त्याचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते.

मात्र अजूनही अनेक मतदार असे आहेत की जे शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी मतदार यादीत आहेत. त्यांची संभाव्य दुबार मतदार यादी आयोगाला शोधता आलेली नाही. तसेच एखाद्याने जरी लिहून दिले की मी ग्रामीण भागात मतदान करेल तरी जिप पंस निवडणुका आणि पालिका निवडणुका वेगवेगळ्या दिवशी होणार असल्याने असे मतदार दोन्ही ठिकाणी मतदान करू शकतील यावर कोणती कारवाई होऊ शकते याबाबत आयोगाने स्थानिक प्रशासनाला कोणतेही निर्देश किंवा मार्गदर्शन केलेले नाही. त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी नावे असलेले संभाव्य दुबार मतदार शोधणे देखील महत्वाचे आहे.

 

पालिकेत २३२९ मतदारांची नावे बदलली

 

दरम्यान अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग प्रमाणे मतदार याद्यांमध्ये बहुसंख्य मतदारांची नावे या प्रभागातून त्या प्रभागात टाकली गेली होती. याबाबत सुमारे ३४६३ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी कर्मचार्यांमार्फत खात्री केल्यावर २३२९ हरकतीत तथ्य आढळून आले. त्यांना मंजुरी देऊन ते राहत असलेल्या प्रभागात त्यांची नावे टाकण्यात आली आहेत.

११३४ हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. त्यात काही नागरिकांनी राहत असलेला प्रभाग सोडून दुसऱ्याच प्रभागात नावे टाकण्याची मागणी केली होती , काही नागरिकांची नावे विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत नव्हती मात्र १ जुलै नंतर त्यांनी मतदार यादीत नाव शहरात समाविष्ट केले , आणि काही ग्रामीण भागात मतदार असतानाही शहरात नाव समाविष्ट करण्याची मागणी करत होते अशा सर्व हरकती फेटाळल्या आहे.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

जळगावकरांना मिळणार अनोखी जनजागरण पर्वणी

Next Post

पत्रकार यांच्यावर तिघांचा प्राणघातक हल्ला

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पत्रकार यांच्यावर तिघांचा प्राणघातक हल्ला

पत्रकार यांच्यावर तिघांचा प्राणघातक हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif