नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव, (वा.) भारतीय किसान संघातर्फे जिल्हाभरात गुरूवारी १८ सप्टेंबर राेजी प्रांतािधकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांची निवेदने देण्यात आले.
अितवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, एमएसपी भावाने खरेदी, ई पीक पाहणीची ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ देण्याची मागणी िनवेदनाव्दारे करण्यात अाली अाहे िजल्ह्यात रावेर, जामनेर, चाळीसगाव, जळगाव, धरणगाव, यावल, अमळनेर, बाेदवड, मुक्ताईनगर तालुक्यात एकाचवेळी एकाच िदवशी तहसीलदार, प्रांतािधकारी यांना िनवेदन देण्यात अाले.
पीएम एएसएचए आधारित एमएसपी भावाने सोयाबीन, भात, कडधान्य, मका, कापूस खरेदी करणे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांचे पंचनामे झालेले आहे, त्यांना त्वरित त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणे, गत वर्षीप्रमाणे विमाच्या तरतुदी पूर्ववत ठेवणे, ई पीक पाहणी मुदत ३०सप्टेंबर पर्यंत वाढवणे, एप्रिल, मे मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या कांद्याच्या नुकसानीची भरपाई देणे, शेतमाल भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत कांदा पिकाला प्रतिक्विंटल १००० रुपये अनुदान मिळावे. तीन हजार हमीभाव मिळावा. कांदा निर्यात बंदी न करता निर्यातीचे प्रमाण वाढवावे, अशा आशयाचे निवेदन दिले.
िनवेदन देताना रावेरला भारतीय किसान संघाचे िजल्हाध्यक्ष वैभव महाजन, तालुका मंत्री सुशील पाटील, सहमंत्री शुभम पाटील तर जामनेरला िजल्हा मंत्री कर्ण बारी, जिल्हा युवा प्रमुख राहुल बारी, अप्पा महाले, डॉ. भागवत पाटील, डॉ. योगेश सूर्यवंशी, एम.एस. पंडीत, संतोष महाजन, रवींद्र माळी, अमळनेरला प्रांत कार्यकारिणी सदस्य मनोहर बडगुजर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कपिला मुठे, तालुकाध्यक्ष राहुल राजपूत, पाचोऱ्यात जिल्हा कोषाध्यक्ष राजेंद्र बडगुजर, खुशाल महाराज, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष सुजित महाजन, यावलला जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश गडे, चोपडा तालुकाध्यक्ष अिनल पाटील, धरणगावला महाराष्ट्र प्रांत मंत्री सुभाष महाजन, चाळीसगावला तालुका अध्यक्ष विकास चाैधरी, जळगावला िजल्हा प्रचार प्रसिध्दी प्रमुख रामदास माळी, बाेदवडला तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, संभाजी पाटील, श्रावण निकम, सुपडू राऊत, विनोद पाटील, आदी उपस्थित होते.







