नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क by योगेश सुने -बारी
जळगाव – भक्ती आणि श्रद्धेच्या वातावरणात सद्गुरू श्री मोरेश्वर महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तेली चौक येथील श्री अवधूत भजन मंडळ येथे हा सोहळा पार पडला.
सद्गुरु मोरेश्वर महाराज हे अवधूत महाराज म्हणून ओळखले जायचे त्यांनी अवधूत सांप्रदाय खान्देशात रुजवला भडगाव येथे दत्तमठी त्यांचे समाधी मंदिर असून त्यानी येथे दत्तजयंती उत्सव सुरु केला दत्त जयंतीला खानदेशातून त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात.
अशा थोर संत परमपूज्य मोरेश्वर महाराज उर्फ अवधूत महाराज यांचा जन्मोत्सव जळगाव येथे साजरा झाला.
या उत्सवात दि ७ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर दरम्यान सकाळी ८ ते ११ आणि दुपारी २ ते ५ या वेळेत श्री पंत गुरुचरित्र पोथी पारायण करण्यात आले ,९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:३० वाजता प्रेम ध्वजारोहण करण्यात आला . त्यानंतर रात्री ९ पासून अखंड भजन सेवा १० सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता महिला भगिनींनी ” शिवतनया निजवी केशव जाया बाळा जो जो रे… या पाळणा हा पाळणा गायीला त्यात जन्मोत्सव, त्यानंतर आरती, पुष्पांजली आरत धावा, व द्रष्ट काढणे असे विविध धार्मिक कार्यक्रम असे कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अवधूत भजन मंडळाचे
सदस्य, महिला भगिनी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.








