नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क by योगेश सुने -बारी
जळगाव : भक्ती आणि श्रद्धेच्या वातावरणात सद्गुरू श्री मोरेश्वर महाराजांचा जन्मोत्सव यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तेली चौक येथील श्री अवधूत भजन मंडळ येथे हा सोहळा पार पडला.
दिनांक ७ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर दरम्यान सकाळी ८ ते ११ आणि दुपारी २ ते ५ या वेळेत श्री पंत गुरुचरित्र पोथी पारायण करण्यात
आले
९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:३० वाजता प्रेम ध्वजारोहण करण्यात आला . त्यानंतर रात्री ९ पासून अखंड भजन सेवा १० सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता महिला भगिनींनी ” शिवतनया निजवी केशव जाया बाळा जो जो रे… हा पाळणा गायीला त्यात जन्मोत्सव, त्यानंतर आरती, पुष्पांजली आरत धावा, व द्रष्ट काढणे असे विविध धार्मिक कार्यक्रम असे कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते.







