• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

पाळधी-खोटेनगर व कालिंका माता–तरसोद मार्ग काँक्रिटीकरणचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

२७.५० कोटींच्या निधीतून १५ मी.चे रुंदीकरण: प्रवाशांना मोठा दिलासा.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 10, 2025
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सरकारी योजना
पाळधी-खोटेनगर व कालिंका माता–तरसोद मार्ग काँक्रिटीकरणचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव –     जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा रस्ता आर्थिक व सामाजिक विकासाचा महामार्ग ठरणार आहे. अनेक अपघात, धूळधाण आणि रहदारीच्या त्रासातून प्रवाशांना दिलासा मिळणार असून जून २०२६ पर्यंत जरी मुदत असली तरी मार्चमध्येच हा रस्ता जनतेच्या सेवेत आणण्याचा आमचा निर्धार आहे. रस्त्याच्या कामावरील ठिकठिकाणी फलक लावून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची ठेकेदारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.*

 

जळगाव शहरालगत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला अखेर गती मिळाली आहे. पाळधी ते खोटेनगर (५.२० किमी) तसेच कालिंका माता मंदिर ते तरसोद हायवे (३.३० किमी) असा एकूण ८.५ किमी रस्त्याच्या भव्य काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते.

 

*रस्त्याचे वैशिष्ट्य*

हा रस्ता आतापर्यंत १० मीटर रुंदीचा होता. आता तो १५ मीटर रुंद होणार असून, त्यात १२ मीटर मजबूत काँक्रिटीकरण रस्ता व दोन्ही बाजूंना १.५ मीटर साईड पट्टे असतील. या कामासाठी केंद्र शासनाकडून तब्बल २७ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

 

*पाठपुराव्याचे फळ*

या रस्त्याच्या मंजुरीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे कामाला गती मिळाली असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

 

यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हा रस्ता विकसित होणार असल्याने शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्हाला भरघोस निधी उपलब्ध करून शहराच्या विकासासाठी मदत केली आहे. या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले तर आभार सरपंच विजय पाटील यांनी मानले.

 

यावेळी आ. राजूमामा भोळे, सरपंच पारधी बु., विजय पाटील, पाळधी खुर्द सरपंच लक्ष्मीताई कोळी, उद्योजक शरद कासट, गोपाल कासट, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, सचिन पवार, रवींद्र चव्हाण, हाजी आसिफ पठाण, श्रीकृष्ण साळुंखे, ग्रामविकास अधिकारी डी.डी. पाठक, अहमद शेख पठाण, पन्नालाल पाटील, पंकज सोमाणी, मयूर कासट यांच्यासह परिसरातील सरपंच, पदाधिकारी व या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Previous Post

पालकमंत्र्यांसह जलसंपदा मंत्र्यांकडून गोदावरी आईंना अभिवादन 

Next Post

सद्गुरू श्री मोरेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव साजरा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
सद्गुरू श्री मोरेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव साजरा

सद्गुरू श्री मोरेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif