नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क सिंगनुर ता. रावेर येथील रहिवाशी भाजपा राज्य सचिव प्रा.संजय मोरे यांना संपुर्ण महाराष्ट्र राज्यातुन प्रथम एकमेव असा अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीने सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय गौरनीय कार्य केल्याबदल इंटरनॅशनल हॉटेल डिव्हेनचर कर्नाल (हरियाणा) येथे शांतीमय संगीतमय दिमाखदार सोहळ्यात जम्मु काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला, सिने अभिनेत्री मंदाकिमी,सिने अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री, यांच्या हस्ते राष्ट्ररत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया सुप्रीमो नरेंद्र अरोरा,अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष रणज्योत सिंग, संपुर्ण भारत देशातील पदाधिकारी मान्यवरच्या उपस्थिती मध्ये देण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप अशोकस्तंभ चिन्ह स्थित ट्रॉफी प्रमाणपत ५१००० रुपये चा धनादेश तिरंगा पुष्पहार फेटा देऊन प्रा .संजय मोरे व मायाताई मोरे यांचा सन्मान करण्यात आला.
प्रा मोरे यांना या आधी शासनाचे अनेक पुरस्कार सह भारतीय दलीत साहित्य अकादमी दिल्ली येथे ७ डिसेंबर २००४ रोजी तालकटोरा. मैदान दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, विशेष सेवा श्री राष्ट्रीय पुरस्काराने दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते व इतर संस्था सामाजिक संघटना मार्फत अनेक पुरस्कार मिळाले असुन त्याच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा राष्ट्रीय पुरस्कार रावेर तालुक्यातील जळगांव जिल्हा महाराष्ट्र राज्या साठी अभिमानाची गौरवणीय बाब असुन मला मिळालेला हा राष्ट्ररत्न राष्ट्रीय पुरस्कार हा माझ्या वैयतिक प्रवासाचा नाही तर जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बहुजन दीन दलीत गोरगरीब जनतेच्या प्रेमाचा व आशीर्वादाचा विश्वासाचा सन्मान आहे. असे त्यांनी सांगितले. प्रा.संजय मोरे यांना मिळालेला राष्ट्ररत्न राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बदल त्याच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्याच्या शिरपेशात मानाचा तुरा रोवला गेला आहे .तर रावेर तालुक्यातील व जिल्हाभरातील त्यांच्या प्रयजनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मिळालेल्या ५१००० धनादेश क्षयरोग ग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी
सन्मान सोहळा प्रसंगी प्रा.संजय मोरे यांना मिळालेल्या ५१००० रू. चा धनादेश त्यांनी भारत देशातील क्षयरोग ग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी अँटी करप्शन सुप्रिमो यांना सुपूर्द केला.यांच्या कामागिरी बद्दल सामाजिक,आरोग्य व राजकीय या सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या शुभेच्छा.
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बदल जलसंपदा मंत्री शिरीष महाजन युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे सर्व शक्ती सेना राष्ट्रीय सुप्रीमो निरज सेठी मा.समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप आ . गिरीष व्यास डॉ.सोहनपाल सुमनाक्षर आ. अमोल जावळे आ.राजु मामा भोळे कार्यकारी अभियंता स्वातीताई सुराणा कार्यकारी अभियंता सुभाष राऊत मुख्याध्यापक पी .टी. महाजन मुख्याध्यापक सुधाकर चौधरी मुख्याध्यापक बी.के.पाटील प्रल्हाद बोंडे नायब तहसीलदार संजय तायडे प्रा.भालचंद्र जडे जे . टी.महाजन इंजी. कॉलेज अध्यक्ष शरद महाजन अँटी करप्शन राज्य उपाध्यक्ष प्रशांत जाधव डॉ.महेंद्र भालेराव डॉ.सुरेंद्र सुरवाडे डॉ.सुनील सुर्यवंशी डॉ.सुरेखा इंगळे उप प्राचार्य विवेक बोंडे राजेंद्र पाटील या सह असंख्य मित्र परिवार लोकांनी अभिनंदन







