• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

पाळधी तरसोद बायपासवर भीषण अपघात : दोन ठार एक गंभीर

पाळधी बायपास कचरा फॅक्टरी जवळची घटना: रस्त्याचे काम सुरू असल्याने एका बाजूने होती वाहतूक.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 28, 2025
in जळगाव ग्रामीण, क्राईम
पाळधी तरसोद बायपासवर भीषण अपघात : दोन ठार एक गंभीर

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; motionR: 0; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 151.90598;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 32;zeissColor: bright;

Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

पाळधी तरसोद बायपासवर भीषण अपघात : दोन ठार तर एक गंभीर जखमी !

जळगाव नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यातील महामार्गावर अपघाताच्या मालिका नेहमीच सुरु असतांना आता शहराबाहेरून जाणाऱ्या पाळधी ते तरसोद बायपास महामार्गाचे उद्घाटन होण्यापूर्वीच दोन ट्रक समोरासमोर धडकून अपघात झाला. या घटनेत एस. के. मौलाली (४०, रा. एरुपालम, जि. खंमत, तेलंगणा) हा चालक तर दुसऱ्या ट्रकचा चालक असे दोन जण ठार झाले. तर १ जण गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी (२७ऑगस्ट) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास कचरा फॅक्टरीसमोर बायपासवर झाला.

 

 

सविस्तर वृत्त असे कि, गुजरातमधील मोरबी येथून खाकीनाडा (आंध्र प्रदेश) येथे टाईल्स घेऊन जाणारा ट्रक (क्र. एपी ३९, युएफ ३५९९) बायपासवरून जात असताना समोरुन भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्र. जी.जे. १६, एवाय ००७८) ओव्हरटेकच्या प्रयत्नात जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, दोन्ही ट्रकच्या केबिनचा पूर्णपणे चुराडा होऊन त्या एकमेकांमध्ये अडकल्या.टाईल्स घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक एस. के. मौलाली हा ठार झाला. तर या ट्रकचा क्लिनर एस. के. जानी याने कॅबिनमधून उडी घेतल्याने त्याला काहीही दुखापत झाली नाही बायपासचे उद्घाटन होणे बाकी आहे. त्यापूर्वी चाचणी म्हणून एक बाजू वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. यात दोन्ही बाजूने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू असताना हा अपघात झाला. घटनास्थळी तालुका पोलिसांनी जाऊन बचावकार्य करण्यासह वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविली.

 

 

धडक देणाऱ्या ट्रकमध्ये कोळसा होता. धडकेनंतर त्यातील कोळसा समोरील ट्रकवर जाऊन पसरला होता. शिवाय ट्रकच्या केबिनचा चुराडा झाल्याने दोन्ही ट्रकचे चालक व एका ट्रकच्या क्लिनरला काढण्यासाठी दोन ते अडीच तास लागले. ट्रकमधील कोळसा जेसीबीच्या सहाय्याने उपसण्यात आला व त्यानंतर ट्रक मागे ओढून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यातील एकाचा मृत्यू झाला. एक गंभीर आहे. टाईल्स घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक एस. के. मौलाली हा ठार झाला

बातमी शेअर करा !
Previous Post

इम्पिरियल विद्यार्थी गणेश मंडळाने केले जल्लोषात गणेशाचे स्वागत

Next Post

हरियाणा येथे प्रा.संजय मोरे राष्ट्ररत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
हरियाणा येथे प्रा.संजय मोरे राष्ट्ररत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

हरियाणा येथे प्रा.संजय मोरे राष्ट्ररत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif