जळगाव – ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त ‘बहिणाईची वाणी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका सौ. प्रणिता झांबरे मॅडम यांनी भूषविले. पर्यवेक्षक नरेंद्र पालवे सर, सौ. प्रतिभा लोहार मॅडम व सौ. सुचिता बाविस्कर मॅडम यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
‘माझी माय सरसोती’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नूतन बारी, चेतन बारी, रितेश पाटील, दर्शन कोळी, यश पवार यांनी नाट्यछटेतून बहिणाबाईंचा जीवनपट सादर केला. ‘आली कापनी कापनी’ या गीतावर तेजश्री सोनवणे, दर्शिका लोहार, श्रेया बागुल, हर्षिता पाटील, दिव्या सोनार, इशिका वाघ यांनी नृत्य केले, तर ‘मन वढाय वढाय’ या गीतावर दिशा धाडे, सृष्टी लंके, जान्हवी सपकाळे, केतकी धनगर, हिरकणी सनंसे यांनी नृत्यसादरीकरण केले. ‘अरे संसार संसार’ व ‘अरे खोप्यामधी खोपा’ ही गीते मिताली वानखेडे, निधी जगताप, मृणाली सुर्यवंशी, दिव्या शिरसाट यांनी गाऊन वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाचे संयोजन, लेखन व सूत्रसंचालन सौ. रत्नमाला शिंदे यांनी केले होते. मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांना बक्षिसपर पुस्तके देऊन अभिनंदन केले. शेवटी सौ. मंगला लोडते मॅडम यांनी भावपूर्ण ओव्या गात सर्वांचे आभार मानले.







