भाजपाच्या जोडे मारोला रा. काँ.चे दुग्धभिषेककाने उत्तर
नाथाभाऊ यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात
आ. एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे दुग्धभिषेक
जळगाव प्रतिनिधी माजी मंत्री विद्यमान विधान परिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्या बद्दल अक्षेपाहार्य वक्तव्य केल्याचा कारणावरून भाजपातर्फे नाथाभाऊंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले होते तर यावेळी एका भाजप पदाधिकाऱ्याने नाथाभाऊंच्या प्रतिमेवर थुंकल्याने राष्ट्रवादी चांगली आक्रमक झाली होती. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेला दुधा अभिषेक करून जोरदार प्रत्युत्तर दिले.
भाजप आणि हनीट्रॅप च्या विषयाने बदनाम होत असल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी नाथाभाऊंच्या प्रतिमेला शाही व काळे फासण्याचा केविलवाना प्रकार करण्यात आला असून. खोट्या केसेस करणे व नाथाभाऊंना एन केन प्रकारे बदनाम करण्यासाठी महायुती करून आंदोलन सहारा घेत असल्याचा आरोप देखील यावेळी कार्यकर्त्यांना केला.
त्यांच्या या कृत्याचा निषेध म्हणून आज शनिवार रोजी दुपारी चार सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार तर्फे आमदार एकनाथराव खडसे यांच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनाचा घोषणा देऊन व त्यांच्या प्रतिमेला दुग्धअभिषेक करण्यात आला.
तसेच नाथाभाऊ के सम्मान मैं राष्ट्रवादी काॅग्रेस मैदान में , नाथाभाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ मैं है अशा घोषणा देऊन परिसर दणातून सोडला .
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील राष्ट्रवादी युवक जिल्हाअध्यक्ष विश्वजीत पाटील, युवक शहर अध्यक्ष रिकू चौधरी , माजी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजरी, सुनील माळी , अल्पसंख्यक जिल्हा अघ्यक्ष मजहर पठाण , राजू मोरे , डॉ रिझवान खाटीक , इब्राहिम तडवी , प्रदेश सरचिटणीस जयप्रकाश चांगरे , किरण राजपूत , भगवान सोनवणे , प्रमोद पाटील , कलाबाई सिरसाठ, संजय पाटील , आशिफ शेख , आकाश हिवाळे , चेतन पवार , संजय जाधव , सुहास चौधरी , अमजद खाटीक , इम्रान खान , फारुक शेख , कैलास पाटील , रफिक पटेल , भल्ला तडवी , गणेश पाटील , प्रभाकर माळी, अविनाश माहिरे व आदी उपस्थित होते.







