• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मुंबई डबेवाल्यांची कीर्ती सातासमुद्रापार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 9, 2025
in जळगाव, शैक्षणिक
मुंबई डबेवाल्यांची कीर्ती सातासमुद्रापार
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट (स्वायत्त ) महाविद्यालयांत मॅनेजमेन्ट गुरु डबेवाला यांचे व्याख्यान संपन्न

  • जळगाव -मुंबईतील डबेवाल्यांची कीर्ती सातासमुद्रापार आहे. मुंबईतील डबेवाल्यांचा इतिहास फार रंजक असून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची सेवा थांबत नाही. असे प्रतिपादन मुंबई डब्बेवाला असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुभाष तळेकर यांनी केले. ते
  •  खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत व्यवस्थापन विभागातर्फे मॅनेजमेंट  तर्फे आयोजित व्याख्याने ते बोलत होते.
  • कार्यक्रमाचे सुरुवातीला व्यासपीठावर उपस्थित ,के सी ई संस्थेच्या शैक्षणिक संचालिका व सोलापूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रा.डॉ .मृणालिनी फडणवीस ,के सी ई संस्थेचे कोषाध्यक्ष डी टी पाटील ,डॉ शिल्पा बेंडाळे , सहसचिव श्री प्रवीणचंद्र जंगले , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी या मान्यवरांचे हस्ते कार्यक्रमाचे सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन झाले . मुंबई डबेवाला   सुभाष तळेकर यांनी प्रेरणादायी गोष्टीचा समावेश केला आहे.
  • यामध्ये डबेवाल्यांचा पूर्ण इतिहास, त्यांचा पोशाख, त्यांची सेवा, त्यांचं व्यवस्थापन आणि वितरण प्रणाली यावर विशेष लक्ष केंद्रित केलं डबेवाल्यांचं पूर्ण व्यवस्थापन त्यांचं जीवन राहणीमान यावर या धड्यामध्ये प्रकाश टाकण्यात आला . मुंबईतील डबेवाल्यांची कीर्ती सातासमुद्रापार आहे. मुंबईतील डबेवाल्यांचा इतिहास फार रंजक असून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची सेवा थांबत नाही. लाखो लोकांना वेळेवर डबे पोहोचवण्याचं काम ते करत असताना त्यांचं व्यवस्थापन व कार्यप्रणाली हे दखलपात्र आहे.व्यवस्थापन कौशल्याने डबेवाले काम करतात . जसं जसं डबेवाले काम करत गेले तसं तसं व्यवस्थापनाचे उच्चांक आपोआप घडत गेले. गिनिजबुकात डबेवाल्यांची नोंद झाली.सिक्स सिग्मा मिळाला ISO प्रमाणपत्र मिळाले. दिवसाला २ लाख डबे घरातुन कार्यालयात व जेवून रिकामी झालेले २ लाख डबे पुन्हा घरी पोचवायचे म्हणजेच दिवसाला ४ लाख डब्यांची देवाण घेवाण डबेवाले करतात. चर्चगेट ते विरार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण व नवी मुंबई या दरम्यान ५ हजार डबेवाले काम करत आहेत.अश्या अडचणीच्या व्यवस्थापनातून त्यांना वेळेचे व्यवस्थापन , टीम लीडर ,संभाषण ,संवाद कौशल्य ,शिस्त ,या टिप्स त्यांनी सांगितल्या . या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच शहरातील नागरिक विद्यार्थी उपस्थतीत होते . कार्यक्रमाला म्युझिक क्लब ची मदत लाभली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा श्रुतिका घरडे तर आभार प्रदर्शन प्रा हर्षा देशमुख यांनी केले.

 

 

बातमी शेअर करा !
Previous Post

रेडिओ मनभावन तर्फे ‘ बाल निरीक्षणगृहात प्रेमाचे धागे गुंफत रक्षाबंधन’

Next Post

भाजपाच्या जोडे मारोला रा. काँ.चे  दुग्धभिषेककाने उत्तर 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भाजपाच्या जोडे मारोला रा. काँ.चे  दुग्धभिषेककाने उत्तर 

भाजपाच्या जोडे मारोला रा. काँ.चे  दुग्धभिषेककाने उत्तर 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा

कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

April 19, 2026
‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत..

ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत..

April 19, 2026
मुंबईच्या वानखेडे स्टेडियम पेक्षाही जेसीएलचे ग्राउंड चांगल्या दर्जाचे – मंत्री गिरीश महाजन

मुंबईच्या वानखेडे स्टेडियम पेक्षाही जेसीएलचे ग्राउंड चांगल्या दर्जाचे – मंत्री गिरीश महाजन

April 19, 2026
चाळीसगाव होणार स्वतंत्र जिल्हा?

चाळीसगाव होणार स्वतंत्र जिल्हा?

April 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif