एकलव्य क्रीडा संकुलात जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा
- जळगाव – भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनेची आठवण करून देणारा जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने एकलव्य क्रीडा संकुलात उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी परिसरातील सर्व आदिवासी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रतिभाताई शिंदे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. एकलव्य क्रीडा संकुलाचे सर्व कर्मचारीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात एकलव्य प्रतिमेचे पूजन करून व मल्ल्याअर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी एकलव्याच्या आदर्श जीवनाची व आदिवासी समाजाच्या शौर्य, त्याग व सांस्कृतिक वारशाची प्रेरणादायी परंपरा अधोरेखित केली.






