जळगाव– खान्देश कॉलेज एजूकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात, पॉलीटेकनिकच्या प्रथम वर्षाच्या नवप्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रॅम २०२५ ला सुरुवात करण्यात आले आहे. महाविद्यालयात ‘विद्यारंभ’ या संकल्पनेतून महाविद्यालायकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन दि. ०५ ऑगस्ट २०२५ पासून करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाद्वारे हसत खेळत शिकूया विज्ञान, विद्यार्थी व आदर्श जीवन, शैक्षणिक भेट, विविध मनोरंजनाचे, खेळाचे व विविध कलेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयात असलेल्या नवीन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख् पाहुणे- के.सी.ई. संस्थेच्या शैक्षणिक संचालिका, व सोलापूर विद्यापिठाच्या माजी कुलगुरू प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव चे प्राचार्य डॉ.पराग पाटील,
के.सी.ई. संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.डी.टी. पाटील, संचालक श्री.शशिकांत वडोदकर, के.सी.ई. सोसायटी चे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी, पॉलिटेक्निक समन्वयक प्रा.बी.जे.लाठी यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे मनोगत व्यक्त करतांना महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात तयार राहण्याचे आवाहन केले, व संस्थेच्या मॅनेजमेंट तर्फे महाविद्यालयात करण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधांची माहिती दिली व पॉलीटेकनिकचे शिक्षण घेत असताना ‘के स्कीम’ द्वारे अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन, अभ्यासेतर कार्यक्रम, शैक्षणिक सोयीसुविधा, विद्यार्थिनींना मोफत शिक्षण इ. विषयांवर माहिती दिली.
डॉ. पराग पाटील यांनी त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना ‘विद्यारंभ’ या शब्दाचा अर्थ सांगितल, तसेच मूल्याधारित शिक्षण व नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयी महत्व सांगितले. तसेच शिक्षण घेत असताना नेहमी जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेवा असे प्रतिपादन केले.
तसेच डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून कौशल्य विकास शिक्षण यावर भर दिला व सांगितले की शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामूळे शिक्षण संपत नाही. पहिल्या दिवसापासूनच ध्येय ठेवा, टोकाच्या भूमिकेपासून स्वतःला दूर ठेवा, आपल्याजवळ असलेले छंद व आवड, विज्ञान तंत्रज्ञान यांचा उपयोग जीवनात करा व अभ्यासेतर कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच नवप्रवेशित विद्यार्थी म्हणजे चैतन्याच्या लाटा आहेत, तरंग आहेत; अश्या तरतरीत विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य सोनेरी करावे, संकटांना न घाबरता, न डगमगता धैर्याने पुढे वाटचाल करावी.
श्री.वडोदकर सरांनी सांगितले की निसर्गावर, आई वडील, सभोवताली असलेल्या प्राणीमात्रांवर, व समाजावर प्रेम करा. प्रेम, शिक्षण, मैत्री, माणुसकी या चार गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
या प्रसंगी परीक्षेत प्रत्येक वर्षी प्रथम व द्वितीय यश मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला टाळ्यांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित विद्यार्थी व पालक वर्ग यांनी सहभोजनाचा आनंद घेतला
कार्यक्रमाच्या वेळी प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, पॉलीटेकनिक समन्वयक प्रा.बी.जे. लाठी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन् प्रा.गणेश पाटील, एच.आर.विभाग प्रमुख प्रा.श्रुतिका घरडे, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा.जगदीश पाटील,कॉम्पुटर विभाग प्रमुख प्रा.तुषार धुमाळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभाग प्रमुख प्रा.अर्चना शेवाळे उपस्थित होते.
सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीततेकरिता मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.चैताली चौधरी व प्रा.कामिनी पवार, वरुण इंगळे, स्नेहल सपकाळे, तर आभारप्रदर्शन प्रा.वैशाली खडके यांनी केले.







