नवराज्य Live न्यूज नेटवर्क
धरणगाव : अखिल भारतीय सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाच्या मेळाव्यात ग्रामीण साहित्यिक व कवी शरद माधवराव पाटील यांच्या ‘जगलेल्या कविता’ आणि ‘ओंजळभर स्वप्न’ या दोन काव्यसंग्रहांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. हा कार्यक्रम रविवार दि. २२ रोजी धरणगाव येथे संपन्न झाला.
काव्यगंध प्रकाशन मुद्रित या काव्यसंग्रहांचे प्रकाशन मा. ना. गुलाबरावजी पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीतथा पालकमंत्री, जळगाव), तसेच मा. ना. संजयजी सावकारे (वस्त्रोद्योग मंत्री), श्रीमती स्मिताताई वाघ(जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार),श्री. राजेशजी जाधव (डेप्टी कमिशनर जी. एस टी, ठाणे), मराठा उद्योगक मंडळाचे अध्यक्ष श्री.आनंदरावजी चौथे, श्री. सोमनाथ भाऊ मराठे (अध्यक्ष मराठा समाज मंडळ),श्री.भानुदास भागवत पाटील (मा. अध्यक्ष), श्री.पी.के. पाटील,कवी शरद पाटील, श्री. भगवान महाजन (सरपंच, धनोरा), सौ. सुरेखाताई अनिल पाटील (मा. प. समिती सभापती, धरणगाव), सौ. मायाताई ईश्वर पाटील(नगरसेविका, सुरत ),ह.भ. प. समाधान महाराज भोजेकर श्री. जानकीराम पाटील (मा. जि. प. उपाध्यक्ष )गणेश चव्हान, नशिराबाद तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, मराठा समाजाचे पदाधिकारी, उद्योजक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.
धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील रहिवासी कवी शरद माधवराव पाटील यांच्या साहित्यिक योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले. ग्रामीण भागातून साहित्यनिर्मिती करत आपल्या लेखणीतून समाजजीवन, अनुभव आणि भावविश्व व्यक्त करणाऱ्या कवी शरद माधवराव पाटील यांच्या या दोन काव्यसंग्रहांच्या प्रकाशनामुळे साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.





