• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

धावपटू अतुलसिंह हाडा यांना कांस्य पदक, संजय मोती द्वितीय : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्समध्ये जळगावच्या धावपटूंची चमकदार कामगिरी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 23, 2026
in जळगाव, क्रीडा
धावपटू अतुलसिंह हाडा यांना कांस्य पदक, संजय मोती द्वितीय : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव:नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या ७ व्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स स्पर्धेत ‘जळगाव रनर्स ग्रुप’चे धावपटू अतुलसिंह हाडा आणि संजय मोती यांनी नेत्रदीपक यश संपादन करत जळगावचा नावलौकिक उंचावला आहे. या स्पर्धेत अतुलसिंह हाडा यांनी कांस्य, तर संजय मोती यांनी रौप्य पदकाची कमाई केली असून, या दोघांचीही आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो खेळाडू सहभागी झालेल्या या दोन दिवसीय स्पर्धेत जळगावच्या धावपटूंनी आपला दबदबा कायम राखला. ५०+ (पन्नास वर्षांवरील) वयोगटात झालेल्या ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अतुलसिंह हाडा यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदक जिंकले. तसेच, १० किलोमीटर धावण्याच्या खडतर स्पर्धेत संजय मोती यांनी उत्कृष्ट वेळेची नोंद करत द्वितीय क्रमांक पटकावला आणि रौप्य पदकाचे मानकरी ठरले.

नागपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

राज्यस्तरीय स्पर्धेतील या दमदार कामगिरीच्या जोरावर अतुलसिंह हाडा आणि संजय मोती हे दोन्ही खेळाडू आता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. येत्या ८ ते १० जानेवारी २०२७ दरम्यान नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल जळगाव रनर्स ग्रुपच्या सदस्यांसह शहरातील क्रीडा, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: अतुलसिंह हाडाजळगावजळगाव रनर्स ग्रुपधावपटूमहाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्ससंजय मोती
Previous Post

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर – अशोक जैन

Next Post

साहित्यिक शरद माधवराव पाटील यांच्या दोन काव्यसंग्रहांचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

साहित्यिक शरद माधवराव पाटील यांच्या दोन काव्यसंग्रहांचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वर्ल्ड मेयर फोरममध्ये दीपमाला काळेंनी मांडले जळगावचे व्हिजन!

वर्ल्ड मेयर फोरममध्ये दीपमाला काळेंनी मांडले जळगावचे व्हिजन!

November 28, 2026
खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

November 28, 2026
मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग 

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग 

November 26, 2026

अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या जळगाव जिल्हा संघटकपदी रविंद्र हिवरकर यांची निवड

November 24, 2026
साहित्यिक शरद पाटील यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन!

साहित्यिक शरद पाटील यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन!

November 24, 2026
जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

November 24, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif