• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग 

महापौर दीपमाला काळे यांनी घेतले अत्याधुनिक शहर विकासाचे धडे

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 26, 2026
in जळगाव, विकासकामे
मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव:शाश्वत आणि विकसित शहरांच्या निर्मितीसाठी मुंबई येथे आयोजित ‘थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट २०२६’ या जागतिक परिषदेत जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशातील आणि परदेशातील विविध शहरांच्या महापौरांशी संवाद साधतानाच,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे मार्गदर्शनही त्यांना लाभले. या जागतिक अनुभवांचा उपयोग जळगाव शहराच्या नियोजनबद्ध, स्वच्छ आणि शाश्वत विकासासाठी होणार आहे.

परिषदेच्या उद्घाटन सत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू, विविध राज्यांचे मंत्री, मुंबईच्या महापौर रितूताई तावडे, ‘एआयआयएलएसजी’चे अध्यक्ष रणजीत चव्हाण यांच्यासह अनेक देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात शहरांच्या विकासातील महापौर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका अधोरेखित केली.

“शहरे ही विकासाची इंजिने असून सक्षम स्थानिक स्वराज्य संस्था ही विकसित भारताची पायाभरणी आहे,” असे प्रतिपादन करत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या नागरी परिवर्तनाचा व्यापक दृष्टिकोन मांडला.

तीन महत्त्वाच्या सत्रांमध्ये विचारमंथन

परिषदेच्या पहिल्या दिवशी महापौर दीपमाला काळे यांनी नागरी विकासाशी संबंधित तीन महत्त्वाच्या सत्रांमध्ये सहभाग घेतला.

*अर्बन इंडिया @ २०४७*: २०४७ मधील भारतातील शहरांची संकल्पना, भविष्यातील शहरी विकास आणि आधुनिक शहरांची उभारणी यावर चर्चा झाली.

*मेयर्स राउंड टेबल टॉक* : महापौरांच्या सहभागातून शहरांचे प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील आव्हाने आणि विकासाच्या विविध पैलूंवर विचारमंथन करण्यात आले.

*शहरी कचरा व्यवस्थापन व सर्क्युलर इकॉनॉमी*: कचऱ्याचा पुनर्वापर आणि ‘सर्क्युलर इकॉनॉमी’च्या माध्यमातून कचरा समस्येवर शाश्वत उपाययोजना कशा राबवता येतील, याचे धडे तज्ज्ञांनी दिले.

“जागतिक स्तरावरील मान्यवर, तज्ज्ञ आणि विविध देशांच्या महापौरांशी संवाद साधून अनेक आधुनिक कार्यपद्धती जाणून घेता आल्या. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि या परिषदेतील जागतिक अनुभव जळगाव शहराला अधिक स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध बनवण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतील.”

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव महानगरपालिकाजागतिक महापौर परिषदथर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट २०२६महापौर दीपमाला काळेमुंबई जागतिक महापौर परिषदशहर विकास
Previous Post

अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या जळगाव जिल्हा संघटकपदी रविंद्र हिवरकर यांची निवड

Next Post

खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वर्ल्ड मेयर फोरममध्ये दीपमाला काळेंनी मांडले जळगावचे व्हिजन!

वर्ल्ड मेयर फोरममध्ये दीपमाला काळेंनी मांडले जळगावचे व्हिजन!

November 28, 2026
खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

November 28, 2026
मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग 

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग 

November 26, 2026

अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या जळगाव जिल्हा संघटकपदी रविंद्र हिवरकर यांची निवड

November 24, 2026
साहित्यिक शरद पाटील यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन!

साहित्यिक शरद पाटील यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन!

November 24, 2026
जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

November 24, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif