• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे

मुंबईत २५ व २६ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन; जगभरातील सुमारे एक हजार महापौर व शहरी प्रशासनाचे प्रतिनिधी सहभागी होणार .

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 24, 2026
in जळगाव
विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव :ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट (AIILSG) च्या शताब्दी महोत्सवाच्या समारोपानिमित्त मुंबईतील फेअरमॉन्ट हॉटेल येथे दि. २५ व २६ नोव्हेंबर रोजी तिसरा ‘विश्व महापौर फोरम’ आणि सातवी ‘एशियन सिटीज समिट’ ही भव्य आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या जागतिक स्तरावरील परिषदेत जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे या सहभागी होणार असून, त्या जळगाव शहराचे प्रतिनिधित्व करतील.

या आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी जगभरातून सुमारे एक हजाराच्या आसपास महापौर आणि शहरी प्रशासन प्रतिनिधी एकत्र येणार आहेत. यामध्ये परदेशातील तब्बल ७५ महापौरांनी आपली अधिकृत नोंदणी केली असून, देशांतील ५०० हून जास्त शहरांचे प्रतिनिधी तसेच देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून विविध महानगरपालिकांचे महापौर, नगरीय संस्थांचे पदाधिकारी, धोरणकर्ते आणि शहरी विकास तज्ज्ञ एकाच मंचावर येणार आहेत.

महत्त्वाच्या विषयांवर तांत्रिक सत्रे व विचारमंथन

दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत शहरी विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने विविध विषयांवर सखोल चर्चा व विचारमंथन होणार आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि जलसंधारण (पाणी बचत), नद्या आणि पर्यावरणीय परिसंस्थेचे पुनरुज्जीवन,पर्यावरण संरक्षण आणि ‘नेट झिरो सिटी’ची निर्मिती, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण आणि शहरी वाहतूक व्यवस्था, नागरी प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) भूमिका, महानगरीय व्यवस्थापन आणि हवामान बदलाची आव्हाने याविषयी चर्चा होईल.

या जागतिक परिषदेतील सहभागामुळे जळगाव शहराच्या शाश्वत विकासासाठी, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी आणि आधुनिक नागरी सुविधांच्या अंमलबजावणीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावीन्यपूर्ण उपक्रम आणि तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची मोठी संधी महापौर दीपमाला काळे यांना मिळणार आहे.

बातमी शेअर करा !
Tags: एशियन सिटीज समिटजळगाव बातम्याजळगाव महानगरपालिकामहापौर दीपमाला काळेमुंबई आंतरराष्ट्रीय परिषदविश्व महापौर फोरम
Previous Post

साहित्यिक शरद माधवराव पाटील यांच्या दोन काव्यसंग्रहांचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

Next Post

जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वर्ल्ड मेयर फोरममध्ये दीपमाला काळेंनी मांडले जळगावचे व्हिजन!

वर्ल्ड मेयर फोरममध्ये दीपमाला काळेंनी मांडले जळगावचे व्हिजन!

November 28, 2026
खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

November 28, 2026
मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग 

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग 

November 26, 2026

अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या जळगाव जिल्हा संघटकपदी रविंद्र हिवरकर यांची निवड

November 24, 2026
साहित्यिक शरद पाटील यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन!

साहित्यिक शरद पाटील यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन!

November 24, 2026
जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

November 24, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif