• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पिंप्राळा आणि निमखेडी परिसरातील विकासकामांना वेग!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रस्ते व गटारींच्या कामांचे भूमिपूजन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 21, 2026
in जळगाव
पिंप्राळा आणि निमखेडी परिसरातील विकासकामांना वेग!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव: शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ आणि १० मधील पिंप्राळा व निमखेडी परिसरातील शिवरोड येथील रस्ते व गटारींच्या विकासकामांचा शुभारंभ आज शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी पार पडला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते कुदळ मारून आणि श्रीफळ वाढवून या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

 

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानातून ही कामे हाती घेण्यात आली आहेत. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या महासभेत शहरातील मूलभूत सोयीसुविधांसाठी या कामांना मंजुरी देण्यात आली होती. या विकासकामांना आता प्रत्यक्ष प्रारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

 

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख व गटनेते विष्णू भंगाळे, स्थायी समिती सदस्य व भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, ललित कोल्हे कुंदन काळे गणेश सोनवणे यांच्यासह स्थानिक नगरसेवक सुरेश सोनवणे, माधुरी बारी, जाकिर खान, कविता भोई, कविता पाटील, अमर जैन, नरेंद्र पाटील, मानसी भोईटे आणि जयश्री पाटील मंडल मंडल अध्यक्ष अतुल बारी किरण भाई राहुल पाटील सागर पाटील अजय देशमुख रवी पाटील दीपक भुसारी यांच्यासह महापालिका प्रशासनातर्फे अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता मनोज वनेरे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव महानगरपालिकानिमखेडीपिंप्राळामहाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानविकासकामांचे भूमिपूजनशिवरोड
Previous Post

कोविड काळातील साहित्य खरेदीवरून १७.७२ कोटींच्या अपहाराचा आरोप; तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह सात जणांविरुद्ध गुन्हा

Next Post

शिव कॉलनी ते १०० फुटी रोड रस्त्याच्या कामाला सुरुवात

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शिव कॉलनी ते १०० फुटी रोड रस्त्याच्या कामाला सुरुवात

शिव कॉलनी ते १०० फुटी रोड रस्त्याच्या कामाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वर्ल्ड मेयर फोरममध्ये दीपमाला काळेंनी मांडले जळगावचे व्हिजन!

वर्ल्ड मेयर फोरममध्ये दीपमाला काळेंनी मांडले जळगावचे व्हिजन!

November 28, 2026
खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

November 28, 2026
मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग 

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग 

November 26, 2026

अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या जळगाव जिल्हा संघटकपदी रविंद्र हिवरकर यांची निवड

November 24, 2026
साहित्यिक शरद पाटील यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन!

साहित्यिक शरद पाटील यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन!

November 24, 2026
जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

November 24, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif