• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव जिल्ह्यात ६६ कोटी ७० लाखांचे अंमली पदार्थ नष्ट; ४६.१५४ ग्रॅम अंम्फेटामाइनसह मेथाक्वालोनचा समावेश

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; रांजणगाव एमआयडीसी येथे नियमानुसार नाश प्रक्रिया पूर्ण

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 9, 2026
in जळगाव, क्राईम
जळगाव जिल्ह्यात ६६ कोटी ७० लाखांचे अंमली पदार्थ नष्ट; ४६.१५४ ग्रॅम अंम्फेटामाइनसह मेथाक्वालोनचा समावेश
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले सुमारे ६६ कोटी ७० लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ नियमानुसार नष्ट करण्यात आले. यात एकूण ४६.१५४ ग्रॅम वजनाचे अंम्फेटामाइन आणि मेथाक्वालोन या अंमली पदार्थांचा समावेश होता.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, केंद्र सरकारचे नियम तसेच महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या सूचनांनुसार जप्त अंमली पदार्थांचा नाश करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.

दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या स्टोअर रूममधून पंचांसमक्ष आणि वजन-मापे निरीक्षक गौतम उत्तम बावस्कर यांच्या उपस्थितीत जप्त अंमली पदार्थ सीलबंद अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जळगाव पोलीस मुख्यालयातून सशस्त्र पोलीस बंदोबस्तात हा मुद्देमाल पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथे नेण्यात आला.

तेथे M/s Maharashtra Enviro Power Ltd. या कंपनीच्या ठिकाणी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीच्या मान्यतेनुसार अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.

या कारवाईच्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, राहुल बैसाणे, सागर पाटील, उमाकांत पाटील तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

जप्त अंमली पदार्थांचा नियमानुसार नाश करून पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाईतील महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण केली.

बातमी शेअर करा !
Tags: अंमली पदार्थअंमली पदार्थ नाशजळगावजळगाव पोलीसश्रीकांत धिवरेस्थानिक गुन्हे शाखा
Previous Post

‘प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांच्या भेटीला!

Next Post

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif