• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

‘प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांच्या भेटीला!

खा. उज्ज्वल निकम यांच्यासह अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांची ११ ऑक्टोबरला जळगावात उपस्थिती; मोटारसायकल रॅलीचे आयोजन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 9, 2026
in जळगाव, Uncategorized
‘प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांच्या भेटीला!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव  : राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटातील प्रमुख कलाकारांसह स्वतः खासदार उज्ज्वल निकम हे रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव येथे उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 4.45 वाजेला

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासून ते छत्रपती संभाजी नाट्यगृह दरम्यान मोटारसायकल रली निघेल.

‘प्रहार’ चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. खासदार उज्ज्वल निकम यांच्या जीवनातील विविध पैलू व त्यांच्या कार्याचा प्रवास आणि न्यायव्यवस्थेतील योगदानावर आधारित या चित्रपटाची उत्सुकता चित्रपटप्रेमींमध्ये आहे.

या पार्श्वभूमीवर जळगाव येथे आयोजित कार्यक्रमाला अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी तसेच खासदार उज्ज्वल निकम यांची उपस्थिती लाभणार आहे. या चित्रपटा बद्दल राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या सोबत संवाद साधण्याची संधी जळगावकर रसिकांना असणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन ‘खासदार उज्ज्वल निकम कार्यक्रम मित्र परिवार समिती’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे समितीचे अध्यक्ष आहेत. नंदकुमार बेंडाळे, भरत अमळकर, अनिश शहा, अनिल कांकरिया, युसुफ मकरा, डॉ रेखा महाजन, डॉ राजेश पाटील, किरण बच्छाव, प्रकाश पाटील, अमर कुकरेजा, ऍड भरत देशमुख, रोहित निकम, जितेंद्र लाठी, प्रसाद सूर्यवंशी, राहुल पवार, प्रतिक्षा सोनवणे, विराज कावडिया, हर्षल पाटील हे सदस्य या समितीचे प्रमुख आहेत.

जळगावकरांसाठी हा विशेष कार्यक्रम खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेतुन समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह पदाधिकारी यांनी केले.

बातमी शेअर करा !
Tags: उज्ज्वल निकमजळगावप्रहार चित्रपटमोटारसायकल रॅलीराजकुमार राववामिका गब्बी
Previous Post

जळगावच्या पाणीपुरवठ्यावर अतिरिक्त भार नको; स्टेडियमसाठी स्वतंत्र जलव्यवस्था करा

Next Post

जळगाव जिल्ह्यात ६६ कोटी ७० लाखांचे अंमली पदार्थ नष्ट; ४६.१५४ ग्रॅम अंम्फेटामाइनसह मेथाक्वालोनचा समावेश

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव जिल्ह्यात ६६ कोटी ७० लाखांचे अंमली पदार्थ नष्ट; ४६.१५४ ग्रॅम अंम्फेटामाइनसह मेथाक्वालोनचा समावेश

जळगाव जिल्ह्यात ६६ कोटी ७० लाखांचे अंमली पदार्थ नष्ट; ४६.१५४ ग्रॅम अंम्फेटामाइनसह मेथाक्वालोनचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif