नवराज्य Live न्यूज नेटवर्क
गोवा : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला.
त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करत सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.
नाना पाटेकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली होती. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘अब तक छप्पन’ आणि ‘वेलकम’ यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील एक दमदार आणि बहुआयामी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.






