• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : महापौर दीपमाला काळे यांचे नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 8, 2026
in जळगाव, जलसंवर्धन
पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत समाधानकारक पाऊस न पडल्याने राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व १५ तालुके दुष्काळी जाहीर केले आहेत. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे नेते तथा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या आवाहनानुसार जळगाव शहर महानगरपालिकेने पाणी नियोजनासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

मंगळवारी (दि. ६ रोजी महापौर दीपमाला काळे यांनी पाणीपुरवठा विभागाची विशेष बैठक घेऊन शहरातील पाणी पुरवठा आणि नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस पाणीपुरवठा विभाग प्रमुख घृष्णेश्वर साळुंखे यांच्यासह संबंधित अभियंते व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील पाण्याचा तुटवडा जाणवू नये यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीत माहिती देताना महापौरांनी सांगितले की, सुदैवाने मागील काळात वाघूर धरणात पाण्याचा साठा व्यवस्थित जतन करून ठेवण्यात आल्यामुळे यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत त्याचा मोठा आधार व लाभ शहराला मिळत आहे. धरणात पुढील जून महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, हे पाणी जूनपर्यंत टिकवण्यासाठी सर्वांनी काटेकोरपणे पाणी बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. शहरात अनेक भागांत गरजेपेक्षा जास्त वेळ पाणी राहून ते वाया जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शहरातील सर्व भागांचा सर्व्हे करून पाणी पुरवठ्याची वेळ समान निश्चित केली जाईल, जेणेकरून कुठेही पाणी सांडणार नाही, असे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.

नळांना तोट्या बसवणे बंधनकारक; दोन दिवसांनंतर होणार कारवाई

शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरगुती व व्यावसायिक नळांना तत्काळ तोट्या (कॉक्स) बसवून घ्याव्यात. ज्यांच्या नळांना तोट्या नसतील किंवा जे पाणी वाहू देतील, अशांवर पुढील दोन दिवसांनंतर महानगरपालिकेकडून थेट दंडात्मक कारवाई सुरू करण्यात येणार आहे. शहरात कुठेही पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी त्याची माहिती फोटोसह महानगरपालिकेला द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

उघड्या नळांमधून किंवा पाईपद्वारे गटारात पाणी सोडणे, धुळीसाठी किंवा स्वच्छतेसाठी रस्त्यावर पाणी मारणे, पाईपने वाहनांवर पाणी मारून गाड्या धुणे अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांचे फोटोसहित पुरावे प्राप्त होताच त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर दीपमाला काळे यांनी दिला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी ओळखून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजळगाव जिल्हादुष्काळपाणी बचतपाणीटंचाईपाणीपुरवठा
Previous Post

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार राजूमामा भोळे सरसावले ; मुख्यमंत्र्यांकडे २ लाखांचा धनादेश केला सुपूर्द!

Next Post

नटसम्राट हरपला….!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
नटसम्राट हरपला….!

नटसम्राट हरपला....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif