• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह सौहार्दपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्मितीवर भर

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 9, 2026
in जळगाव, शैक्षणिक
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महाविद्यालय परिसरात रॅगिंगला पूर्णपणे प्रतिबंध करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सन्मान, मैत्रीपूर्ण संबंध आणि सकारात्मक संवाद वाढविण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत महाविद्यालयातील विद्यमान रॅगिंग प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, रेक्टर सुरेंद्र गावंडे, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, चेतन साखरे, विद्यार्थी प्रतिनिधी स्वराज आणि मुस्कान, लिपीक ललीत बोंडे हे उपस्थित होते. नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी जुळवून घेताना कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधी नियम, त्याचे गांभीर्य आणि तक्रार नोंदविण्याच्या विविध माध्यमांची माहिती देण्यावर भर देण्यात आला.महाविद्यालयाच्या विविध विभागांमध्ये तसेच वसतिगृह परिसरात नियमित पाहणी, विद्यार्थ्यांशी संवाद आणि आवश्यकतेनुसार समुपदेशन करण्याबाबतही चर्चा झाली.  रॅगिंगमुक्त, सुरक्षित आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक जबाबदारीने कार्य करावे, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. तसेच पुढील महिन्यात वरीष्ठ आणि कनिष्ठ विद्यार्थ्यांसमवेत संयुक्त बैठकीच्या आयोजनाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावडॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयरॅगिंग प्रतिबंधक समितीरॅगिंगमुक्त परिसरविद्यार्थी सुरक्षावैद्यकीय शिक्षण
Previous Post

नटसम्राट हरपला….!

Next Post

लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अर्जुन पवार यांची नियुक्ती

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अर्जुन पवार यांची नियुक्ती

लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अर्जुन पवार यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वर्ल्ड मेयर फोरममध्ये दीपमाला काळेंनी मांडले जळगावचे व्हिजन!

वर्ल्ड मेयर फोरममध्ये दीपमाला काळेंनी मांडले जळगावचे व्हिजन!

November 28, 2026
खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

November 28, 2026
मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग 

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग 

November 26, 2026

अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या जळगाव जिल्हा संघटकपदी रविंद्र हिवरकर यांची निवड

November 24, 2026
साहित्यिक शरद पाटील यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन!

साहित्यिक शरद पाटील यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन!

November 24, 2026
जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

November 24, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif