• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

“खडसे फार्महाऊस” ड्रोन रेकी प्रकरणी चौकशी?

सखोल चौकशी करून खडसे कुटुंबीयांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 6, 2026
in जळगाव, राजकारण
“खडसे फार्महाऊस” ड्रोन रेकी प्रकरणी चौकशी?
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : माजी मंत्री तथा विद्यमान विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसची ड्रोनद्वारे रेकी करण्यात आल्याच्या कथित प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच खडसे कुटुंबीयांना अतिरिक्त सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या वतीने करण्यात आली.

याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री मुक्ताईनगर येथील आमदार एकनाथराव खडसे यांच्या फार्महाऊस परिसरात ड्रोनद्वारे निगराणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. फार्महाऊसवरील सुरक्षारक्षकांनी ड्रोनचे व्हिडिओ चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी आमदार खडसे यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याचेही सांगण्यात आले.

या घटनेची तातडीने आणि सखोल चौकशी करून ड्रोनद्वारे निगराणी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच संपूर्ण खडसे कुटुंबीयांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)च्या पदाधिकाऱ्यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून संबंधित आरोपींना अटक करण्यात यावी. तसेच मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष राजुभाऊ मोरे, डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन, महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील माळी, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश बारे, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, महानगर अध्यक्ष गिरीश सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, गणेशभाऊ पाटील, नईम खाटीक, रफीक पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा !
Tags: एकनाथराव खडसेखडसे सुरक्षाजळगावड्रोन रेकीमुक्ताईनगरराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

रक्तदान दिन रक्तदानाचे महत्त्व; सामाजिक बांधिलकी एनएसएसतर्फे जनजागृती

Next Post

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif