• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार!

कृषी संशोधन, शिक्षण व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींना मिळणार चालना

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 8, 2026
in जळगाव, Uncategorized
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव – संशोधन, शिक्षण, विस्तार आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षमतांना चालना देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. काटेकोर शेती, स्वयंचलित सिंचन प्रणाली आणि डिजिटल शेती या क्षेत्रांत संयुक्त संशोधन व संस्थात्मक सहकार्य वाढविणे हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरीचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी अखिल भारतीय समन्वित जलसिंचन व पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे डॉ. अभय पाटील, जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, डॉ. बाळकृष्ण तसेच जळगाव येथील तीळ पैदासकार डॉ.सुरेंद्रसिंग राजपूत, जळगाव कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील हे उपस्थित होते.

या करारांतर्गत आधुनिक सूक्ष्म सिंचन, सिंचनाचे स्वयंचलित प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काटेकोर सिंचन, सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर आणि भूपृष्ठाखालील ठिबक सिंचन या विषयांवर संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. विविध प्रम्मुख पिकांसाठी सिंचनाचे वेळापत्रक, पाण्याचा काटेकोर वापर, सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन यासंबंधी पीकनिहाय प्रमाणित कार्यपद्धती विकसित करण्यात येतील. त्यामध्ये ड्रोनद्वारे फवारणी, इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात आयओटी सेन्सर्स आणि उपग्रह प्रतिमांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही या करारात भर देण्यात आला आहे. विद्यापीठातील कृषी व कृषी अभियांत्रिकी शाखांच्या पदवी विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये आणि संशोधन प्रक्षेत्रांवर प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तसेच कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर संशोधन करणान्या निवडक पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा संशोधन साहित्याच्या शाखांच्या पदवी विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनच्या उत्पादन उत्पादन प्रकल्पामध्ये अणि संशोधन इत्यादीवर भर देण्यात आला आहे. तसेच कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर संशोधन करणान्या निवडक पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा संशोधन साहित्याच्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य उपल्ब करून देण्याची तरतूद आहे. या सहकार्यमुळे आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीतील संशोधनाला गती मिळून विद्यार्थ्यांचे कौशल्यवर्धन आणि संशोधनाधारित तंत्रालया प्रसाराला चालना मिळणार आहे.

जैन इरिगेशन समवेत झालेल्या या करारामुळे शाश्वत शेतीसाठी तंत्रज्ञानाचा मजबूत पाया

कराराचे प्रमुख उद्देश आधुनिक सिंचन तंत्रज्ञान, डिजिटल शेती आणि काटेकोर शेती क्षेत्रात संयुक्त संशोधन.

विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे.

कृषी क्षेत्रातील समस्यांवर संशोधन व तंत्रज्ञानाचा प्रसार.

पाणी व खतांचा कार्यक्षम वापर, उत्पादनवाढ आणि शाश्वत शेतीसाठी सहकार्य.

संशोधनाचे प्रमुख विषय

आधुनिक सूक्ष्म सिंचन व स्वयंचलित सिंचन प्रणाली

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काटेकोर सिंचन

सिंचनाद्वारे विद्वाव्य खतांचा कार्यक्षम वापर

भूपुष्ठाखालील ठिबक सिंचन

पीकनिहाय सिंचन वेळापत्रक व पाण्याचा काटेकोर वापर

सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन व एकात्मक कीड व रोग व्यवस्थापन

ड्रोनद्वारे फवारणी, उपग्रह प्रतिमांचा समावेश

 

फोटो कॅप्शन – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यात सामंजस्य करारा प्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. अनिल ढाके, डॉ. के.बी. पाटील, डॉ. बी.के. व अन्य मान्यवर

बातमी शेअर करा !
Tags: आधुनिक सिंचनजैन इरिगेशनजैन इरिगेशन सामंजस्य करारडिजिटल शेतीमहात्मा फुले कृषी विद्यापीठराहुरी
Previous Post

“खडसे फार्महाऊस” ड्रोन रेकी प्रकरणी चौकशी?

Next Post

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार राजूमामा भोळे सरसावले ; मुख्यमंत्र्यांकडे २ लाखांचा धनादेश केला सुपूर्द!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार राजूमामा भोळे सरसावले ; मुख्यमंत्र्यांकडे  २ लाखांचा धनादेश केला सुपूर्द!

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार राजूमामा भोळे सरसावले ; मुख्यमंत्र्यांकडे २ लाखांचा धनादेश केला सुपूर्द!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif