नवराज्य Live न्यूज नेटवर्क
रावेर : रावेर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते श्रीराम प्रभूंच्या भव्य जन्मभूमीचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येकडे रवाना झाले आहेत. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य सचिव प्रा. संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा धार्मिक प्रवास आयोजित करण्यात आला आहे.
अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन महाराष्ट्र राज्य सचिव, सर्व शक्ती सेना हिंदुत्ववादी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य सचिव प्रा. संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली रावेर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते या धार्मिक दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
या प्रवासाचा कालावधी आठ दिवसांचा असून, यादरम्यान विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन दर्शन घेण्यात येणार आहे. प्रवासाची सुरुवात कुरुक्षेत्र येथून होत असून, त्यानंतर अयोध्येतील विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे नियोजन आहे.

या धार्मिक प्रवासादरम्यान जनकपुरी, राजा दशरथ ब्रह्मघाट, हनुमानगढी, कनक भवन, दशरथ भवन, गुप्तार घाट, राम की पैडी आणि नागेश्वर मंदिर आदी प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. तसेच अयोध्येतील श्रीराम प्रभूंच्या भव्य रामजन्मभूमीचे दर्शन घेण्यात येणार असून, सीतामाता आणि लक्ष्मण यांच्याशी संबंधित धार्मिक स्थळांनाही भेट देऊन दर्शन घेतले जाणार आहे.
या आठ दिवसांच्या प्रवासात विविध तीर्थक्षेत्रांचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा अनुभवत दर्शन घेण्यात येणार असून, नियोजित कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर सर्वजण रावेरकडे परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.

या धार्मिक दौऱ्यात महिला आघाडी मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्षा तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. मायाताई संजय मोरे, अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया चिफ डायरेक्टर महाराष्ट्र राज्य प्रल्हाद भाऊ बोंडे, तसेच मंगलाताई निकम, कोकिळाताई पाटील, आशाताई चौधरी, मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशनचे जिल्हा सल्लागार किसन महाजन, दत्तात्रेय पवार, वैभव गोरवले, रोहन भोईर, अक्षय बाम्हणे, रोहन सावळे, प्रणव गोरवले आणि ओंकार भोसले यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
श्रीराम जन्मभूमी अयोध्येसह विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या आठ दिवसांच्या धार्मिक प्रवासामुळे सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.






