• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पक्ष आणि सामाजिक क्षेत्रात स्व. हरिभाऊंचे मोठे योगदान!

स्व. हरिभाऊ जावळे यांच्या आठवणींना आमदार सुरेश भोळे व ज्येष्ठ भाजप नेते उदय भालेराव यांनी दिला उजाळा; प्रतिमापूजन व माल्यार्पण

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 3, 2026
in जळगाव, राजकारण
पक्ष आणि सामाजिक क्षेत्रात स्व. हरिभाऊंचे मोठे योगदान!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार व आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त जी.एम. फाउंडेशन येथील भाजप कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे स्मरण करून जनसेवेतील योगदानाला आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे, माजी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे तसेच प्रकाश बालाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार सुरेश दामू भोळे व भाजपचे ज्येष्ठ नेते उदय भालेराव यांनी स्व. हरिभाऊ जावळे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा आढावा घेतला. पक्ष संघटनेसोबतच सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान तसेच जनसामान्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध यांचा आवर्जून उल्लेख करण्यात आला.

स्व. हरिभाऊ जावळे यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत जनसेवेची भूमिका सातत्याने जपली. त्यांच्या कार्यातून निर्माण झालेली सामाजिक बांधिलकी आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते आजही स्मरणात असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

कार्यक्रमाला भाजप जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, राहुल वाघ, दीपक परदेशी, शक्ती महाजन, प्रकाश पंडित, मयूर भदाणे, नगरसेवक वैशाली पाटील, अरविंद देशमुख, विजय बांदल, संदीप ढंडोरे, महेश चौधरी, महेश कापुरे, माधुरी देशमुख आणि सरदार तडवी यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

यावेळी स्व. हरिभाऊ जावळे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाला भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

बातमी शेअर करा !
Tags: उदय भालेरावजळगाव न्यूजसुरेश भोळेहरिभाऊ जावळे सामाजिक कार्यहरिभाऊ जावळे स्मृतिदिनहरिशभाऊ जावळे जयंती
Previous Post

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

Next Post

रावेर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी अयोध्या दौऱ्यावर; श्रीराम जन्मभूमीसह विविध तीर्थस्थळांचे घेणार दर्शन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
रावेर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी अयोध्या दौऱ्यावर; श्रीराम जन्मभूमीसह विविध तीर्थस्थळांचे घेणार दर्शन

रावेर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी अयोध्या दौऱ्यावर; श्रीराम जन्मभूमीसह विविध तीर्थस्थळांचे घेणार दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वर्ल्ड मेयर फोरममध्ये दीपमाला काळेंनी मांडले जळगावचे व्हिजन!

वर्ल्ड मेयर फोरममध्ये दीपमाला काळेंनी मांडले जळगावचे व्हिजन!

November 28, 2026
खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

खासदार-आमदारांची संख्या वाढणार; सरकारी तिजोरीवर खर्चाचा डोंगर!

November 28, 2026
मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग 

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग 

November 26, 2026

अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या जळगाव जिल्हा संघटकपदी रविंद्र हिवरकर यांची निवड

November 24, 2026
साहित्यिक शरद पाटील यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन!

साहित्यिक शरद पाटील यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन!

November 24, 2026
जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आपल्या सेवेत!

November 24, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif