• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर; कृषी, पाणी, अन्नप्रक्रिया आणि शाश्वत विकासावर भर- अनिल जैन (उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक)

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 13, 2026
in जळगाव, कृषी
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : “भविष्याचा पाया येथूनच… भक्कम पाया आणि सतत उत्क्रांती” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ची ३९वी सर्वसाधारण वार्षिक सभा कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांच्या अध्यक्षतेखाली प्लास्टिक पार्क येथे उत्साहात झाली. कंपनीच्या भविष्यातील वाटचालीसह कृषी, सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अन्नप्रक्रिया, जलसंवर्धन आणि शाश्वत विकासाच्या विविध उपक्रमांवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. व्यासपीठावर सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, स्वतंत्र संचालक डॉ. नरेंद्र जाधव, मुख्य वित्त अधिकारी बिपिन वळामे, कंपनी सचिव अवधूत घोडगावकर, संचालक शिरीष दलाल हे उपस्थित होते तर डॉ. अशोक दलवाई, सतीश मेहता, नॅन्सी बॅरी ऑनलाइन सहभागी होते. जैन परिवारातील सदस्य, भागधारक तसेच कंपनीचे सहकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अवधूत घोडगावकर यांनी केले.

 

सभेची सुरुवात दिवंगताना श्रद्धांजली अर्पण करून झाली. ऑडिटरचा अहवाल सादर करण्यात आला. तसेच विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले. अजित जैन यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली, तर अथांग जैन व अभेद्य जैन यांची नियुक्ती करण्यात आली.

‘भवरलाल जैन यांच्यासारखा व्हिजनरी पाहिला नाही’ – डॉ. नरेंद्र जाधव

कंपनीचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. “भवरलालजी जैन यांच्यासारखे व्हिजनरी व्यक्ती मी कधीही पाहिलेले नाही. जैन इरिगेशन हे जगातील अद्वितीय मॉडेल आहे. जैन बंधू हे मॉडेल पुढे घेऊन जात आहेत, याचा आनंद आहे,” असे स्वतंत्र संचालक डॉ. नरेंद्र जाधव यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.

एआयसोबत कृषी तंत्रज्ञानाची सांगड

अनिल जैन यांनी कंपनीच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, “आज जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नव्या तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार होत आहे. जैन इरिगेशनची मुळे कृषिक्षेत्रात भक्कम आहेत. या भक्कम पायावर नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी सूक्ष्मसिंचना सोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे.” “जैन इरिगेशन ही केवळ कंपनी नसून शेतकऱ्यांना सर्व दृष्टीने सोल्युशन देणारी कंपनी आहे,” जैन इरिगेशनच्या केळी टिश्युकल्चरमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात पर एकरी वाढ होऊन आमुलाग्र बदल झाला आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘रिसोर्स टू रूट’ कडे वाटचाल

पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत असल्याने जलकार्यक्षमतेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर कंपनी ‘रिसोर्स टू रूट’ या संकल्पनेवर काम करीत असून, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी विविध तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे अनिल जैन यांनी सांगितले. टिश्यूकल्चर रोपांची वाढती मागणी लक्षात घेता अत्याधुनिक हायटेक प्लांटच्या विस्ताराचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. कृषी अवशेषांपासून बायोचार; कार्बन क्रेडिटची संधी कृषी अवशेषांचा प्रभावी वापर करण्यासाठी कंपनीने बायोचार प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे कृषी कचऱ्याचे मूल्यवर्धन होण्यासोबतच मोठ्या प्रमाणात कार्बन क्रेडिट मिळविण्याची संधी निर्माण झाली आहे. शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगण्यात आले.

फार्मिंग इकोसिस्टम विकसित

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हे विकसित भारताच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी केवळ सिंचन नव्हे, तर शेतीभोवती संपूर्ण फार्मिंग इकोसिस्टम विकसित करण्यावर कंपनीचा भर आहे. फूड प्रोसेसिंग क्षेत्रातही कंपनी सातत्याने पुढे जात असून, कृषी उत्पादनाला अधिक मूल्य मिळवून देण्यासाठी प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जात आहे.

फर्टिलायझर क्षेत्रातही संशोधन सुरू असून, लवकरच त्यासंदर्भात पुढील कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. काळी मिरी आणि कॉफीच्या क्षेत्रातील प्रकल्प भविष्यातील कृषी विकासाची दिशा बदलणारे ठरू शकतात, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बाजारातील अस्थिरतेवर मात करत शाश्वत विकास

बाजारातील अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करत कंपनीची शाश्वत विकासाकडे घोडदौड सुरू आहे. पाणी, माती, तंत्रज्ञान, कृषी उत्पादन, अन्नप्रक्रिया आणि पर्यावरण यांचा समन्वय साधत भविष्यासाठी सक्षम व्यवस्था उभारण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे अनिल जैन यांनी स्पष्ट केले. “मुळे भक्कम असतील तरच भविष्याची इमारत मजबूत उभी राहते. जैन इरिगेशनचा पाया कृषी आणि शेतकऱ्यांमध्ये भक्कम आहे; त्यावर तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची उंची वाढवत भविष्य घडविले जात आहे,” या भावनेतून कंपनीच्या पुढील वाटचालीचा आशावादी सूर सभेत उमटला. राष्ट्रगीताने समारोप झाला.

जैन इरिगेशनचा ₹१,५०८ कोटींचा महसूल

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२६-२७च्या “जैन इरिगेशनचा एकत्रित महसूल ₹१,५०८.४ कोटी, तर व्याज, कर, घसारा व अमॉर्टायझेशनपूर्व नफा (EBITDA) ₹१६४.३ कोटी राहिला.” पॉलिमरच्या किमतीतील चढ-उतार आणि मान्सूनच्या वेळेमुळे देशांतर्गत पाइप व ड्रिप व्यवसायातील काही खरेदी पुढे ढकलली गेली. मात्र, कृषी प्रक्रिया आणि परदेशातील प्लास्टिक व्यवसायाने चांगली कामगिरी केली. मे-जूनमध्ये व्यवसायाला गती मिळाली असून कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात कंपनीला यश आले. पॉलिमरच्या किमती स्थिर होत असून चांगल्या पावसामुळे कृषी मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. आर्थिकवर्ष २७ मध्ये दुहेरी अंकातील महसूलवाढ आणि दुसऱ्या सहामाहीत दमदार कामगिरीचा कंपनीला विश्वास आहे असे अनिल जैन यांनी मनोगतात सांगितले.

बातमी शेअर करा !
Tags: अजित जैनअनिल जैनकृषीजैन इरिगेशनजैन इरिगेशन वार्षिक सभाभवरलाल जैन
Previous Post

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर चार ठिकाणी उड्डाणपूल होणार!

Next Post

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा*— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा*— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा*— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

October 18, 2026
श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 16, 2026
जामनेर-बोदवड रस्त्यावर काळाचा घाला ; एकाच दुचाकीवरील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!

जामनेर-बोदवड रस्त्यावर काळाचा घाला ; एकाच दुचाकीवरील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!

October 15, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

October 15, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif