नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव :’मोतीबिंदू मुक्त जळगाव ग्रामीण’ अभियानांतर्गत आज ६०० पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून, माजी जिल्हा परिषद सदस्य मा. प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चष्म्यांचे वितरण करण्यात आले.
GPS ग्रुपच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या तसेच गरजू नागरिकांना दर्जेदार दृष्टीसाहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे. या उपक्रमामुळे शेकडो लाभार्थ्यांना स्पष्ट दृष्टी मिळण्याबरोबरच त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार आहे.
उपस्थित मान्यवरांनी समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. जनसेवेला समर्पित असलेले हे अभियान समाजहितासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.





