• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home न्यायालयातून

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 27, 2026
in न्यायालयातून
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव दि. २६ प्रतिनिधी : उधारीपोटी दिलेला सुमारे २६ लाख ३२ हजार ८४६ रुपयांचा धनादेश अनादरित (चेक बाऊन्स) झाल्याप्रकरणी परभणी येथील वितरक पांडुरंग ट्रेडिंग कंपनीचे सूर्यकांत सिताराम कछवे यांना जळगाव न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीस एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, संबंधित कंपनीस ३० लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून अदा करण्याचे आदेश दिले आहेत.

 

सूर्यकांत सिताराम कछवे यांनी सन २०१५ मध्ये जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीकडून झालेल्या आर्थिक व्यवहारातील उधारीपोटी २६ लाख ३२ हजार ८४६ रुपयांचा धनादेश दिला होता. कंपनीच्या वतीने सदर धनादेश नियमानुसार बँकेत सादर करण्यात आला. मात्र, संबंधित धनादेश अनादरित होऊन बँकेकडून परत आला. धनादेशाचा अनादर झाल्यानंतर कंपनीच्या वतीने कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रकरणी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीने संबंधित व्यक्तीविरुद्ध जळगाव न्यायालयात फौजदारी प्रकरण क्र. ४३२१/२०१५ दाखल केले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपीने दिलेला धनादेश हा कंपनीकडील उधारीच्या रकमेपोटी देण्यात आला होता, ही बाब कंपनीच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. धनादेश, आर्थिक व्यवहार तसेच प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे व कायदेशीर बाबींच्या आधारे न्यायालयात कंपनीच्या वतीने अॅड. निशांत अत्रे यांनी बाजू मांडली. दीर्घकाळ चाललेल्या या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने २० ऑगस्ट २०२६ रोजी निकाल दिला.

 

न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच संबंधित कंपनीस ३० लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून अदा करण्याचे आदेश दिले आहेत. धनादेशाच्या मूळ रकमेपेक्षा अधिक नुकसानभरपाईचा आदेश देण्यात आल्याने या निकालाकडे आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून पाहिले जात आहे. सदर प्रकरणात जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या वतीने अ‍ॅड. निशांत अत्रे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. चंद्रकांत सिताराम कछवे यांनी बाजू मांडली. धनादेशाद्वारे होणारे व्यवहार हे विश्वास आणि आर्थिक बांधिलकीवर आधारित असतात. धनादेश देताना त्यामागील आर्थिक जबाबदारी पूर्ण करण्याची अपेक्षा असते. मात्र, धनादेश अनादरित झाल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. या प्रकरणातील निकालामुळे धनादेशाद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये कायदेशीर जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित झाले आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: # अनादर# कारावास# खटला# चेक बाउन्स# धनादेश# न्यायालयजैन इरिगेशन
Previous Post

काल चार बळींचे निवेदन दिले…अनं पाचवा बळी गेला…अजून किती बळी जाणार?

Next Post

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif