• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

दिवंगत विद्यार्थ्याच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; विद्यार्थी विमा योजनेतून ५ लाख, विद्यार्थी सहायता निधीतून १० हजार आणि सहकाऱ्यांकडून ३५ हजारांची मदत

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 28, 2026
in जळगाव, Uncategorized, शैक्षणिक
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

पाळधी : त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पाळधी येथे १५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील दिवंगत विद्यार्थी रुपेश राजेंद्र पाटील यांच्या आई आशाबाई पाटील व वडील राजेंद्र भीमराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर रुपेश पाटील यांच्या पालकांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागांतर्गत विद्यार्थी विमा योजनेतून मंजूर झालेला पाच लाख रुपयांचा विमा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही विमा रक्कम मंजूर होण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. कुलदीप पाटील व विद्यार्थी विकास प्रभारी श्री. सचिन जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

याशिवाय कुलगुरू विद्यार्थी सहायता निधीतून मंजूर झालेला १० हजार रुपयांचा धनादेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार देशमुख यांच्या हस्ते रुपेशच्या पालकांना देण्यात आला. तसेच रुपेशचे क्लासमेट्स, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे संचालक श्री. मनोज पाटील यांनी एकत्रितपणे जमा केलेली ३५ हजार रुपयांची रोख मदत देखील पालकांना सुपूर्द करण्यात आली.

यावेळी संस्थेचे चेअरमन  मनोज पाटील, सचिव  सुनील पाटील, प्राचार्य डॉ. तुषार देशमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी चेअरमन श्री. मनोज पाटील यांनी, “रुपेशच्या कुटुंबीयांचे दुःख कोणतीही आर्थिक मदत भरून काढू शकत नाही; मात्र या कठीण प्रसंगी संपूर्ण त्रिमूर्ती परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” अशी भावना व्यक्त केली.

दिवंगत विद्यार्थ्याच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यानंतर कुटुंबीयांना आर्थिक मदत सुपूर्द करत महाविद्यालयाने माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रोहित बाविस्कर यांनी केले.

बातमी शेअर करा !
Tags: त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीधरणगावध्वजारोहणपाळधीरुपेश पाटीलस्वातंत्र्य दिन
Previous Post

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

Next Post

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif