• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

उपमहापौर मनोज चौधरी यांची हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट; गोलाणी मार्केटमागील जागेचा पर्याय तपासणी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 30, 2026
in जळगाव, Uncategorized, समस्या
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव  : जळगाव शहर महानगरपालिकेला लागून असलेल्या खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या विविध प्रश्नांबाबत जळगाव शहर हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमहापौर मनोज चौधरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी हॉकर्सच्या विविध समस्या जाणून घेत त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

निवेदन स्वीकारल्यानंतर उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेवक तथा जिल्हाप्रमुख दीपकभाऊ सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस राहुल पाटील आणि उपायुक्त गोसावी यांच्या उपस्थितीत मनपा परिसरालगत असलेल्या खाऊ गल्लीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी खाऊ गल्लीतील हॉकर्स तसेच विविध हॉकर्स संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

२०१४ पर्यंतच्या नोंदणीकृत हॉकर्सचा विशेष विचार

पाहणीदरम्यान सन २०१४ पर्यंत नोंदणीकृत असलेले तसेच नोटरीधारक हॉकर्स यांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा करण्यात आली. संबंधित हॉकर्सना गोलाणी मार्केटच्या मागील बाजूस उपलब्ध असलेल्या जागेत व्यवस्थितपणे व्यवसायासाठी बसविता येईल का, याबाबत मनपा आयुक्तांसोबत बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टेबल-खुर्च्यांऐवजी गाड्यांद्वारे व्यवसायाचा पर्याय

हॉकर्सना व्यवसाय करताना टेबल-खुर्च्या न ठेवता केवळ गाड्यांद्वारे व्यवसाय करता येईल का, याबाबतही चर्चा करण्यात आली. यासाठी मनपा प्रशासन, पदाधिकारी आणि हॉकर्स संघटनेच्या प्रतिनिधींची लवकरच संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

“हॉकर्सचा व्यवसाय आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न कायम ठेवत जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रशासन आणि हॉकर्स यांच्यात समन्वय साधून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल,” अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

हॉकर्सच्या उपजीविकेचा प्रश्न आणि शहराच्या स्वच्छतेचा समतोल साधण्यासाठी मनपा प्रशासन व हॉकर्स संघटनांमध्ये समन्वयाने तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

यावेळी मोहन तिवारी (पथ विक्रेता समिती सदस्य), दिनेश हिंगणे (जळगाव शहर हॉकर्स टपरीधारक संघटना अध्यक्ष), शुभम जाधव (विक्रेता समिती सदस्य) यांच्यासह खाऊ गल्लीतील हॉकर्स बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव खाऊ गल्लीजळगाव मनपाजळगाव महानगरपालिकाजळगाव हॉकर्सजळगाव हॉकर्स संघटनाहॉकर्स समस्या
Previous Post

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

Next Post

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे - शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif